खेळाची वृत्ती हरवली

By Admin | Updated: October 1, 2014 02:06 IST2014-10-01T02:06:09+5:302014-10-01T02:06:09+5:30

सुरुवातीपासून लढतीत वर्चस्व असताना आणि विजय निश्चित असताना अचानक पंचांनी प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयी घोषित करून विवादास्पद निर्णय देत मंगळवारी आशियाई स्पध्रेत क्रीडा भावनेला धक्का दिला.

The game's attitude is lost | खेळाची वृत्ती हरवली

खेळाची वृत्ती हरवली

>सुरुवातीपासून लढतीत वर्चस्व असताना आणि विजय निश्चित असताना अचानक पंचांनी प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयी घोषित करून विवादास्पद निर्णय देत मंगळवारी आशियाई स्पध्रेत क्रीडा भावनेला धक्का दिला. 
भारताच्या एल सरिता देवी आणि देवेंद्रो सिंह लैo्राम यांच्याबाबतीत ही दुर्देवी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुवर्णपदकापासून अवघे एक पाऊल दूर असलेल्या देवीला या निकालाने अo्रु अनावर झाले आणि संपूर्ण जगाने तीला रडताना पाहिले. भारताच्या या खेळाडूने निकालाविरुद्ध काही काळ रिंगमध्येच उभे राहून विरोध दर्शविला, परंतु त्याचा परिणाम निर्णयावर होऊ न देता पंचांनी आपला निर्णय अखेरचा हेच ठणकावून सांगितले. पंचांच्या या निर्णयाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी 5क्क् युएस डॉलर द्यावे लागतात आणि निर्णय आपल्या बाजूने लागला नाही, तरी ते पैसे परत मिळत नाही. अशात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनने गुण देणा:या तिन पंचांविरोधात तक्रार करण्याचा नियम नसल्याचे स्पष्ट करून भारताची तक्रार खोडून काढली. यजमान दक्षिण कोरियाच्या जीना पार्क हिच्याविरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत सरिता देवीचा विजय निश्चितच मानला जात होता, परंतु रिंगवर उपस्थित असलेल्या पंचाने जिनाला विजयी घोषीत केल्याने देवीला धक्काच बसला. या निर्णयामुळे उपस्थित प्रेक्षकांनीही आवाज उठवला. तीला रडू अनावर झाले. यावर भारताचे प्रशिक्षक बी आय फर्नाडिस यांनीही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, हा निर्णय आधीच ठरला होता. देवी 3-क् अशी आघाडीवर होती हे सर्वाना माहित होते, परंतु या निर्णयासाठी पैसा मोजला असावा. 1988च्या सेऊल ऑलिम्पिक स्पध्रेतही अशा प्रकारची घटना घडली होती. त्यानंतर आत्ताही काही बदल झालेला नाही. 
नवीन नियमांनी काही क्रांती झालेली नाही. सरिता देवीचा पती म्हणाला, पदकांसाठी सरिताने अथक मेहनत घेतली होती.  या लढतीत तिचाच विजय निश्चित होता. मात्र, नियमांना धाब्यावर बसवून पंचांनी यजमान खेळाडूच्या बाजूने निकाल लावला.  मंगोलीयाचया खेळाडूलाही असा अनुभव आला.
 
विनय नायडू

Web Title: The game's attitude is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.