गोलंदाज व उथप्पामुळे विजयी झालो : गंभीर

By Admin | Updated: April 21, 2016 04:18 IST2016-04-21T04:18:46+5:302016-04-21T04:18:46+5:30

मंगळवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाज

Gambhir and Uthappa emerged victorious: Gambhir | गोलंदाज व उथप्पामुळे विजयी झालो : गंभीर

गोलंदाज व उथप्पामुळे विजयी झालो : गंभीर

मोहाली : मंगळवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा यांना दिले. पंजाबविरुद्ध एकहाती वर्चस्व राखलेल्या कोलकात्याने ६ विकेटनी सहज बाजी मारली.
‘‘आम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळलो. सर्वप्रथम गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखले. त्यानंतर उथप्पाने लौकिकानुसार खेळ करताना संघाच्या विजयावर कळस चढवला,’’ असे गंभीर म्हणाला. पंजाबविरुद्धचा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला असल्याचे सांगताना गंभीर म्हणाला, ‘‘आमचे गोलंदाज पूर्ण लयीत होते. त्यांनी पंजाबला केवळ रोखूनच ठेवले नाही, तर महत्त्वपूर्ण बळीही मिळविले. यामुळे पंजाबला मोठी भागीदारी करता आली नाही.’’
उथप्पाच्या निर्णायक फटकेबाजीचे कौतुक करताना गंभीर म्हणाला, ‘‘धावांचा पाठलाग करताना आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. उथप्पा आणि माझ्या मते ८२ धावांची मोठी भागीदारी झाली.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Gambhir and Uthappa emerged victorious: Gambhir