गगनजित भुल्लर विजेता
By Admin | Updated: October 3, 2016 06:04 IST2016-10-03T06:04:14+5:302016-10-03T06:04:14+5:30
चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

गगनजित भुल्लर विजेता
सोल : भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. गगनजितचा एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या २८ वर्षीय गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली. तो शनिवारी तिसऱ्या राऊंडच्या शेवटी संयुक्त चौथ्या क्रमांंकावर होता. कपूरथळाच्या गगनजितने जबरदस्त खेळी करून झिम्बाब्वेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेईवू किमला एका शॉटच्या अंतराने मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले.
गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले. या विजेतेपदाने गगनजितचा दोन वर्षांचा चषक जिंकण्याचा दुष्काळ संपला आहे. त्याने एशियन टूरमध्ये २०१३ मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते. २०१४ मध्ये तो मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. (वृत्तसंस्था)
>गेली दोन वर्षे माझ्या कारर्किदीतील सर्वांत कठीण काळ होता. या काळात मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळेच आज हे जेतेपद जिंकू शकलो. हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या जेतेपदामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे.
- गगनजित भुल्लर