नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:37 AM2021-07-20T07:37:50+5:302021-07-20T07:38:27+5:30

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे माझ्या स्वत:च्या प्रवासातील अनेक स्मृती ताज्या झाल्या.

gagan narang says shooters will increase medal count | नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग

नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग

Next

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे माझ्या स्वत:च्या प्रवासातील अनेक स्मृती ताज्या झाल्या. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकला पहिल्यांदा हजेरी लावली त्यावेळी परग्रहावरील मानवासारखे वाटले होते. बीजिंगमध्ये एअर रायफल फायनलमध्ये एका गुणाने माघारलो तेव्हा हृदय द्रवले होते. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्याने काहीसा दिलासा लाभला. २०१६ च्या स्पर्धेत वेगळी कथा होती. खेळाचा चाहता ते पदक विजेता यादरम्यानचे आव्हान पेलताना खेळाला काही देऊ शकतो. ‘गन फॉर ग्लोरी’ या माझ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अहमदाबादच्या शाळेतून इलावेनिल वलारिवनसारखी नंबर वन खेळाडू घडली.

नेमबाजी महागडा खेळ असल्याने अनेक चांगले खेळाडू तो सोडून देतात. आमचा प्रयत्न हिरा शोधणे, त्याला पैलू पाडणे आणि नंतर राष्ट्रीय शिबिरात पाठविणे हा आहे. आम्ही सर्वजण उत्तरदायित्व ओळखून काम करतो. उत्कृष्ट खेळाडूच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी खेळाडूंना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी एक यंत्रणा तयार झाली. खेलो इंडिया गेम्स, क्रीडा शिष्यवृत्ती आणि स्वीकृतीबद्ध प्रशिक्षण हे मार्ग प्रशस्त करण्यात आले आहेत. यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा नंतर टॉप्समध्ये (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) समावेश करण्यात येतो.

खासगी खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. क्राऊडफंडिंग या नव्या ट्रेंडच्या सहकार्याने उच्च-कार्यक्षमतेच्या विकासावर लक्ष केंद्रित करून अधिक व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक होत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा रोमांचक काळ म्हणू शकतो. टोकियो २०२० ने दोन मैलाचे टप्पे गाठले आहेत. भारत ऑलिम्पिकमध्ये आधीपेक्षा मोठे पथक पाठवीत आहे. प्रतिभावान खेळाडू स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी निर्धाराने खेळणार हेच यातून जाणवते. यातून अभूतपूर्व निकालांची अपेक्षा करणे योग्य ठरेल. पदकांची संख्या वाढेल. अनिश्चितता हा खेळाचा एक अत्यावश्यक भाग आहे. क्रीडापटूंना चांगल्याप्रकारे तयार होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत.

(गगन नारंग हे २०१२च्या ऑलिम्पिकचे कांस्य विजेते नेमबाज असून सध्या नेमबाजीत योगदानासाठी ‘गन फॉर ग्लोरी’ हे फाऊंडेशन चालवतात.)
 

Web Title: gagan narang says shooters will increase medal count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.