गगन नारंग बनला नंबर वन

By Admin | Updated: September 6, 2015 00:02 IST2015-09-06T00:02:57+5:302015-09-06T00:02:57+5:30

फॉर्ममध्ये परतलेला आॅलिम्पिक पदकविजेता गगन नारंग आशियाई ५० मीटर रायफल प्रोन नेमबाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. नारंगचे ९७१ गुण असून, चीनचा शेंगबो झाओ

Gagan Narang became number one | गगन नारंग बनला नंबर वन

गगन नारंग बनला नंबर वन

नवी दिल्ली : फॉर्ममध्ये परतलेला आॅलिम्पिक पदकविजेता गगन नारंग आशियाई ५० मीटर रायफल प्रोन नेमबाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. नारंगचे ९७१ गुण असून, चीनचा शेंगबो झाओ ८९६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
पिस्तूलकिंग नावाने ख्यातिप्राप्त असलेला जितू रॉय ५० मीटर पिस्तूलमध्ये १९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रकारातील अव्वल स्थान कोरियाच्या खेळाडूने पटकाविले. बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्णविजेता आणि रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल प्रकारात पाचव्या स्थानावर व गगन सातव्या स्थानावर आहे. नारंगने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत कास्यपदक जिंकून रिओ आॅलिम्पिकची पात्रता गाठली.
जितूनेदेखील मागच्या वर्षी विश्वचॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकून देशासाठी आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. अनेकदा विश्वचषकात चॅम्पियन बनलेल्या नारंगने लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते. जखमा आणि खराब फॉर्म यामुळे त्रस्त राहिलेल्या नारंगला यंदाच्या सत्रात भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने १० मीटर एअर रायफल प्रकारात किमान गुण जिंकण्यात अपयशी ठरताच भारतीय पथकात स्थान दिले नव्हते. फोर्ट बेनिंगमध्ये पात्रता फेरीत नारंगने ६२६.३ गुण मिळवीत आठवे स्थान घेतले. अंतिम फेरीत मात्र १८५.६ गुण जिंकून भारताला नेमबाजी प्रकारात आॅलिम्पिकचे तिसरे तिकीट मिळवून दिले.(वृत्तसंस्था)

Web Title: Gagan Narang became number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.