शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Emerson Royal Attacked: फुल्ल ऑन ड्रामा! नाईटक्लब बाहेर खेळाडूवर रोखली बंदूक, बेछूट गोळीबार अन् एक देवदूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:19 IST

दोघांमध्ये तब्बल २९ राऊंड फायरिंग झालं..

Emerson Royal Attacked, Gunfire Battle: ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक इमर्सन रॉयल एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावला. दरोड्याच्या उद्देशाने त्याच्यावर मोठं संकट आलं होतं, पण सुदैवाने इमर्सन सुखरूप राहिला. एका पोलिस कर्मचाऱ्याने अत्यंत नाट्यमय पद्धतीने इमर्सनवरील हल्ला परतवला. या पोलिसाने दरोडेखोरांशी झुंज दिली आणि इमर्सनला वाचवण्यात यश मिळविले. हा ऑफ-ड्युटी पोलीस ब्राझीलमधील नाईट क्लबच्या बाहेर इमर्सनचे फोटो काढत होता, तेव्हा एक दरोडेखोर आला आणि त्याने इमर्सनवर बंदूक रोखत त्याच्याकडील किमती सामान मागण्यास सुरूवात केली. मात्र पोलीस कर्मचाऱ्याने इमर्सनला या चोरापासून वाचवले.

नाट्यमय पद्धतीने बचावला इमर्सन-

बीबीसीच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने हल्लेखोराला पकडले आणि दोघांमध्ये गोळीबार झाला. मात्र, या दरम्यान फुटबॉलपटूला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. इमर्सनने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “मी तुमचा सदैव ऋणी राहीन. देव या भूमीवर देवदूत पाठवतो, याचा पुरावा मला माझ्या आयुष्यात दररोज मिळतो. मी या माणसाला देवदूत म्हणतो, माझा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला."

दोघांमध्ये 29 राउंड फायरिंग झालं...

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर आणि पोलिसात २९ राउंड फायर झाले. त्यानंतर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती आता चिंताजनक नाही, असे निवेदनात म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री तीन वाजता तो नाईट क्लबमधून बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत हा अपघात झाला. इमर्सनच्या वडिलांनी ग्लोबो एस्पोर्टे या वृत्तपत्राला सांगितले की, "मी पार्टी करत होतो, बाहेर येत असताना ही दुर्घटना घडली जी खूप वाईट आहे. चोराने इमर्सनकडे त्याचे घड्याळ आणि इतर किमती सामान मागितले होते. पण सुदैवाने काही विचित्र घडलं नाही."

टॅग्स :FootballफुटबॉलCrime Newsगुन्हेगारीBrazilब्राझील