शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:53 IST

Jannik Sinner Beat Novak Djokovic: फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला.

फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला. उपांत्य फेरीत जोकोविच पूर्णपणे लयीत नसल्याचे दिसून आले. या पराभवासह नोवाच जोकोविचचे फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. यानिक सिनर आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कार्लोस अल्काराझ यांच्यात या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल.

सेमीफायनल सामन्यात नोवाक जोकोविचने पहिला सेट ६-४ ने गमावला. त्यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. त्याने दुसरा सेट ७-५ ने गमावला. तिसऱ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. मात्र, येथेही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याला ७-६ ने पराभव पत्कारावा लागला.

नोवाक जोकोविच हा पुरुष एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. पण फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तो सिनेरला आव्हान देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर जोकोविच निराश झाला. कदाचित फ्रेंच ओपनमधील हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो, असे त्याने म्हटले. 

"अंतिम सामना दोन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होईल"सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर जोकोविचने आपली प्रतिक्रिया दिली. "फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी भिडतील. मी सिनरला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देतो. ही एक अद्भुत स्पर्धा असणार असेल", असे तो म्हणाला.

 

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच