फ्रँक रिबेरी विश्वकपनंतर निवृत्त

By Admin | Updated: May 22, 2014 05:29 IST2014-05-22T05:29:14+5:302014-05-22T05:29:14+5:30

ब्राझीलमध्ये होणारी आगामी विश्वकप स्पर्धा आपली अखेरची फुटबॉल स्पर्धा असेल, असे मत फ्रान्सचा स्टार फुटबॉल खेळाडू फ्रँक रिबेरी याने व्यक्त केले आहे़

Frank Ribeir retired after the World Cup | फ्रँक रिबेरी विश्वकपनंतर निवृत्त

फ्रँक रिबेरी विश्वकपनंतर निवृत्त

पॅरिस : ब्राझीलमध्ये होणारी आगामी विश्वकप स्पर्धा आपली अखेरची फुटबॉल स्पर्धा असेल, असे मत फ्रान्सचा स्टार फुटबॉल खेळाडू फ्रँक रिबेरी याने व्यक्त केले आहे़ रिबेरी म्हणाला, ब्राझीलमध्ये विश्वकप अखेरचा असला, तरी २०१६ मध्ये होणार्‍या युरो फुटबॉल चषकात खेळण्याची शक्यता आहे़ ब्राझीलमधील विश्वकपनंतर फुटबॉलला अलविदा करणार आहे़ मात्र, विजयासह या स्पर्धेचा निरोप घ्यायला नक्कीच आवडेल़ रिबेरी याने पुढे सांगितले की, आमचा संघ फुटबॉल विश्वकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी आशा आहे़ फ्रान्सीसी फुटबॉचे प्रमुख नोएल ग्राईट यांनी मात्र रिबेरीचा हा निर्णय चुकीच्या वेळी घेतला असल्याचे म्हटले आहे़ ते पुढे म्हणाले, रिबेरी याने आताच निवृत्तीची घोषणा करून चूक केली आहे़ पुढचा विश्वकप चार वर्षांनंतर होणार आहे़ रिबेरी असा खेळाडू आहे़ जो यापुढेही खेळू शकत होता़ (वृत्तसंस्था)

Web Title: Frank Ribeir retired after the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.