भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन
By Admin | Updated: July 20, 2016 12:22 IST2016-07-20T12:22:03+5:302016-07-20T12:22:03+5:30
हॉकी विश्वात स्टीकवर्क आणि ड्रिब्लिंगसाठी ओळखले जाणारे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन झालं आहे

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन
>ऑनलाइन लोकमत -
गुडगाव, दि. 20 - भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन झालं आहे. ते 56 वर्षांचे होते. गेले काही दिवस यकृत आणि किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहम्मद शाहीद यांनी ऑलिम्पिकमध्ये सलग 3 वर्ष 1980, 1984 आणि 1988 मध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
मोहम्मद शाहीद यांना 1986 मध्ये त्यांच्या उत्कृष्ठ खेळासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आलं होतं. तर 1981 साली अर्जुन पुरस्कारानेही शाहीद यांचा गौरव करण्यात आला होता. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये मोहम्मद शाहीद यांच्या नेतृत्तावत हॉकी संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 1984 आणि 1988 च्या ऑलिम्पिकमधील हॉकी संघाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं. मोहम्मद शाहीद मूळचे बनारसचे रहिवासी होते.
हॉकी विश्वात शाहिद यांचं स्टीकवर्क आणि ड्रिब्लिंगसाठी मोठं नाव होतं. शाहीद यांच्या नेतृत्वात 1982 आणि 1986 च्या आशियाई खेळात रौप्य आणि कांस्यपदकी पटकावलं होतं.