माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात दाखल
By Admin | Updated: October 7, 2015 12:12 IST2015-10-07T10:40:09+5:302015-10-07T12:12:31+5:30
माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना पायातील एका नसेत रक्त गोठल्यामुळे मंगळवारी सायंकाळी येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना पायातील एका नसेत रक्त गोठल्यामुळे मंगळवारी सायंकाळी येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हॉस्पिटलने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार या आजारावर वेळीच उपाय झाले नाहीत तर जीवितास धोका निर्माण होतो. रक्तवाहिन्यांत या गाठी अडथळा निर्माण करतात व रक्तप्रवाह अडतो. संबंधित आजाराला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. सुरुवातीच्या उपचारानंतर सिद्धू यांची प्रकृती स्थिर असून त्यांचे रक्त पातळ केले जात आहे. वेदना होऊन अंग सुजणे हे या आजाराचे लक्षण आहे. दरम्यान रुग्णालयात उपचार घेणा-या सिद्धू यांनी ‘दु:खी असलो तरी निराश नाही. जीव धोक्यात घालणा-या या आजारातून देवाच्या कृपेने बरा होईन. आयुष्य महत्त्वाचे आहे. प्रार्थनेने त्याची काळजी घ्या’, असे ट्विट केले आहे.