जर्मनीच्या फुटबॉल मुख्यालयावर धाड
By Admin | Updated: November 4, 2015 01:29 IST2015-11-04T01:29:28+5:302015-11-04T01:29:28+5:30
येथे २००६ मध्ये आयोजित फिफा विश्वचषक फुटबॉलच्या यजमानपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर जर्मनीतील पोलिसांनी जर्मन फुटबॉल मुख्यालयावर (डीएफबी) धाड टाकली.

जर्मनीच्या फुटबॉल मुख्यालयावर धाड
फ्रँकफर्ट : येथे २००६ मध्ये आयोजित फिफा विश्वचषक फुटबॉलच्या यजमानपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर जर्मनीतील पोलिसांनी जर्मन फुटबॉल मुख्यालयावर (डीएफबी) धाड टाकली. मंगळवारी झालेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांच्या खासगी खोल्यांची कसून तपासणी झाली.
विश्वचषक फुटबॉलच्या आयोजनादरम्यान फुटबॉल महासंघाच्या काही अधिकाऱ्यांनी
कर चुकविल्याचा आरोप
डीएफबीवर आहे. डीएफबीने २००५ मध्ये फिफाला ७४ लाख डॉलरची रक्कम दिली होती. तपासकर्त्यांच्या मते ही रक्कम टॅक्स रिटर्नमध्ये नोंदणीकृत नाही.
एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, या रकमेचा वापर २००६च्या विश्वचषकासाठी जर्मनीच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाचेच्या स्वरूपात करण्यात आला. डीएफबीने मात्र हा दावा फेटाळला आहे. (वृत्तसंस्था)