मुंबई उपनगरात मिळणार फुटबॉल प्रशिक्षण
By Admin | Updated: January 13, 2016 03:50 IST2016-01-13T03:50:40+5:302016-01-13T03:50:40+5:30
फुटबॉल प्रशिक्षणासाठी मुंबई उपनगरांतील नवोदित खेळाडूंसाठी दक्षिण मुंबईतील प्रवास रोजचाच झाला आहे. मात्र आता त्यांना होमग्राउंड या उपक्रमामुळे आपल्याच विभागात फुटबॉलचे प्रशिक्षण

मुंबई उपनगरात मिळणार फुटबॉल प्रशिक्षण
मुंबई : फुटबॉल प्रशिक्षणासाठी मुंबई उपनगरांतील नवोदित खेळाडूंसाठी दक्षिण मुंबईतील प्रवास रोजचाच झाला आहे. मात्र आता त्यांना होमग्राउंड या उपक्रमामुळे आपल्याच विभागात फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेल्या या उपक्रमाचे नुकताच ठाकूर व्हिलेज (कांदिवली) येथील ठाकूर स्टेडियममध्ये भारताचा माजी कर्णधार व स्टार फुटबॉलर बायचुंग भूतिया याच्या हस्ते उद्घाटन झाले.
उदयोन्मुख खेळाडूंमधील उत्साह पाहून थक्क झालेल्या भूतियाने सांगितले, की आपल्या देशात लहान मुलांसाठी खेळण्याजो योग्य सुविधांचा अभाव आहे. मात्र ही कमतरता होमग्राऊंड उपक्रमातून संपुष्टात येईल. या उपक्रमातून लहान मुलांना योग्य प्रशिक्षणाद्वारे खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. भारताचे माजी कर्णधार व ‘विफा’चे सीईओ हेन्री मेनेझेस यांचीही उपस्थिती होती. यावेळी भूतिया व मेनेझेस यांनी खेळाडूंना फुटबॉलच्या टीप्सही दिल्या.