मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

By Admin | Updated: February 8, 2015 02:03 IST2015-02-08T02:03:37+5:302015-02-08T02:03:37+5:30

महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कुटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी साताऱ्यात भेट घेऊन त्यांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Five lakhs of help to Mayuresh's family | मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कुटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी साताऱ्यात भेट घेऊन त्यांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
खटाव तालुक्यातील मायणी येथील मयूरेशच्या घरी जाऊन तावडे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास निधीतून ५ लाख रुपयांची मदत त्यांनी घोषित केली तसेच नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी मयूरेश पवारच्या नावाने सातारा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार सुरू करण्याचे आश्वासन तावडे यांनी या वेळी दिले.
मयूरेशचा लहान भाऊ आकाश याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मयूरेशसमवेत स्पर्धेसाठी गेलेला नेटबॉल खेळाडू व त्याचा मित्र गणेश चौधरी मयूरेशच्या मृत्यूने बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. तावडे यांनी त्याचीही भेट घेऊन त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली. गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडून त्याचे कौन्सेलिंग करण्यात येईल. गरज भासल्यास मुंबई अथवा पुणे येथे विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्याला हलवण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Five lakhs of help to Mayuresh's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.