नरसिंंग यादवविरुद्धच्या चाचणीसाठी फिट

By Admin | Updated: May 4, 2016 03:58 IST2016-05-04T03:58:38+5:302016-05-04T03:58:38+5:30

जॉर्जियामध्ये एक महिना कठोर सराव केल्यानंतर सुशीलकुमार याने, आपण या महिन्यात नरसिंग यादवविरुद्ध होणाऱ्या चाचणी लढतीसाठी फिट आणि सज्ज असल्याचे सांगितले.

Fitting for a test against Narsingh Yadav | नरसिंंग यादवविरुद्धच्या चाचणीसाठी फिट

नरसिंंग यादवविरुद्धच्या चाचणीसाठी फिट

नवी दिल्ली : जॉर्जियामध्ये एक महिना कठोर सराव केल्यानंतर सुशीलकुमार याने, आपण या महिन्यात नरसिंग यादवविरुद्ध होणाऱ्या चाचणी लढतीसाठी फिट आणि सज्ज असल्याचे सांगितले.
सलग दोन आॅलिम्पिकमध्ये कांस्य व रौप्य अशी पदके जिंकणारा मल्ल सुशीलकुमार जॉर्जियामध्ये एक महिना सराव करून मायदेशी परतला आहे. या महिन्यात निवड चाचणी होणार आहे. कुस्ती महासंघ याची तारीख निश्चित करेल. मी चाचणीसाठी तयार असून, मला पूर्ण विश्वास आहे, की रिओ आॅलिम्पिकसाठी माझी निवड होईल. गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नरसिंग यादवने कांस्यपदक जिंकून ७४ किलोगटात भारतासाठी आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. आता सुशील आणि नरसिंग यांच्या लढतीतून रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार, हे निश्चित होईल. कुस्तीमध्ये भारताला आतापर्यंत चार तिकिटे मिळाली आहेत. कुस्तीसाठी शेवटची पात्रता स्पर्धा या आठवड्यात तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये होणार आहे.(वृत्तसंस्था)


जॉर्जियात मी तेथील राष्ट्रीय मल्लांसोबत सराव केला आहे. मी ७४ किलोसोबत ८४ किलोगटातील मल्लांसोबतही लढत दिली. हा चांगला अनुभव होता. जॉर्जियाचे पैलवान तयारीचे आहेत. त्यांच्यासोबत लढत देऊन माझी तयारी चांगली झाली आहे. यातून माझा आत्मविश्वास आणि फिटनेस वाढला आहे.
- सुशीलकुमार

Web Title: Fitting for a test against Narsingh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.