आॅलिम्पिक सुवर्णासाठी फिटनेस व सातत्य हवे : सायना
By Admin | Updated: September 2, 2015 23:43 IST2015-09-02T23:43:57+5:302015-09-02T23:43:57+5:30
भारतीय बॅडमिंटनची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायनाला

आॅलिम्पिक सुवर्णासाठी फिटनेस व सातत्य हवे : सायना
नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटनची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायनाला आता रियो आॅलिम्पिकचे सुवर्ण जिंकण्याचे वेध लागले आहेत. पण, त्यासाठी फिटनेस आणि खेळातील सातत्य टिकविण्याची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले.
बुधवारी येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेली सायना म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकचे कास्य आणि विश्व स्पर्धेचे रौप्य जिंकल्यानंतर माझे लक्ष्य रियो आॅलिम्पिकचे सुवर्ण असेल. पण, त्यासाठी सध्याचा फॉर्म वर्षभर कायम राखण्याचे अवघड आव्हान आहे. फॉर्ममधील सातत्याश्विाय मला माझ्या फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागेल. जेतेपद मिळविण्यासाठी शंभर टक्के फिटनेसची गरज असते. त्यासाठी कठोर सराव आणि फिटनेस ट्रेनिंग सुरू आहे. पुढील वर्षीच्या रियो आॅलिम्पिकपर्यंत जखमांपासून दूर राहण्याची अपेक्षा बाळगून आहे.’’
कारकिर्दीचा सुवर्णकाळ...
सध्या माझ्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू असल्याची कबुली देत सायना म्हणाली, ‘‘यंदा मी इंडियन ओपन आणि सय्यद मोदी ग्रॅन्ड प्रिक्स जिंकले. आॅल इंग्लंड आणि विश्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. शिवाय अव्वल स्थानही गाठले. एखाद्या खेळाडूसाठी यापेक्ष़ा मोठी कामगिरी काय असू शकेल?
हैदराबादपेक्षा बंगळुरू लाभदायी...
सराव हैदराबादहून बंगळुरूला हलविल्यामुळे लाभ झाल्याचे सांगून सायना म्हणाली, ‘‘हैदराबादमध्ये ग्रुप ट्रेंिनंगमुळे माझा खेळ प्रभावित व्हायचा. मी विमल सरांशी बोलले आणि वैयक्तिक सराव सुरू केला. त्यांनी फोकस केल्यामुळे माझ्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली. परिणाम पुढे आहे. गेल्या पाच वर्षांत विश्व स्पर्धेत क्वॉर्टरफायनलपुढे सरकत नव्हते. यंदा अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे मागच्या आॅलिम्पिकमध्ये मी कास्य जिंकले होते. पुढच्या वर्षी रियोमध्ये मोठे स्वप्न उराशी बाळगून खेळणार आहे. चीनच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढण्यात मी यशस्वी होऊ शकले. आता स्पेनच्या खेळाडूंचे आव्हान आहे. स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन हिलादेखील पराभूत करण्यात यशस्वी होईन, अशी मला खात्री आहे.’’ सायना नंबर वन, तर मारिन नंबर टू आहे, हे विशेष.
रियो आॅलिम्पिकमध्ये चीनकडून अनपेक्षितपणे दुसऱ्याच खेळाडूची एन्ट्री झाल्यास काय डावपेच असतील, यावर सायना म्हणाली, की अशी शक्यता कमी आहे, पण पहिल्या फेरीत मला सावध राहावे लागेल. (वृत्तसंस्था)