फिट इंडिया

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:52+5:302015-02-21T00:49:52+5:30

भारतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट

Fit India | फिट इंडिया

फिट इंडिया

रतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट
मेलबोर्न : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाचे वृत्त आहे. भारतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट असून निवडीसाठी उपलब्ध आहेत. भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी नेट्समध्ये कसून सराव केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यासह सर्वंच फलंदाजांनी पुलच्या फटक्याचा सराव केला. तळाच्या फलंदाजांसह भारतीय संघातील सर्वंच फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजीचा सराव केला. हा सराव त्यांनी डावखुर्‍या गोलंदाजांविरुद्ध केला हे विशेष. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारतीय फलंदाज कामचलावू गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिका प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच निवडीसाठी सर्वंच खेळाडू उपलब्ध आहेत. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा कसूर सराव केला. रविचंद्रन अश्विननेही फलंदाजीचा सराव केला. या आठवड्याच्या सुरुवातीला नेटमध्ये सराव करताना अश्विनला दुखापत झाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Fit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.