शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरच्या वर्चस्वाला महाराष्ट्राकडून प्रथमच धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:38 IST

महाराष्ट्राची कांची आडवाणी मिस इंडिया

मुंबई  - आधीच नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला. मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.

विक्रमी स्पर्धक आणि अभूतपूर्व गर्दीत शरीरसौष्ठवच्या पुंभमेळ्यात महिलांच्या शरीरसौष्ठव आणि स्पोर्टस् मॉडेल प्रकारात स्पर्धकांचा विक्रमी सहभाग स्फूर्तीदायक ठरला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. या गटात मणिपूरच्या तीन खेळाडू होत्या. पण अवघ्या दीड वर्षात आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या सुडौल बांध्याला पीळदार करणाऱया कांची आडवाणीने इतिहास रचला. श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या या सिंधी कन्येने आपल्या कुटुंबाचा विरोध झुगारत फिटनेसवर केलेल्या मेहनतीला अखेर मिस इंडिया किताबाचे फळ लाभले. विशेष म्हणजे तिने मणिपूरच्या बलाढ्य आणि पीळदार ममता देवी, सरिता देवी आणि जमुना देवीला हरविण्याचा पराक्रम केला.

 

आता माझे सासरे नाचताहेत...

मी श्रीमंत असल्यामुळे माझे शरीरसौष्ठवप्रेम कुणालाच पचत नव्हते. आधी माझ्या आई-वडिलांना माझे फिटनेस आणि मॉडलिंग विश्वातील वावर आवडत नव्हता. मी एका मुलीची आई झाल्यानंतर माझ्या आरामाच्या व्यवसायामुळे थोडी अनफिट म्हणजेच जाडी झाली होती. मला माझे वाढते वजन बघवत नव्हते. तेव्हा मी फिटनेसकडे वळली. तेव्हा मला जाणीव झाले की माझे यात करिअर आहे. मला पॉवरलाफ्टिंग खूप आवडत होते. ते मी माझ्या फिटनेससाठी करत होते. त्याचदरम्यान मला मॉडेलिंगवरही प्रेम जडले. मी फिजीक स्पोर्टस् प्रकारातही खेळणे सुरू केले, पण माझ्या व्यावसायिक सासऱयांना माझे बिकिनी घालून स्टेजवर वावरणे जराही आवडत नव्हते. तरीही माझे फिजीक स्पोर्टस् प्रकारात खेळणे सुरूच होते. मी दोन वर्षांपूर्वी शरीरसौष्ठवाची माझी तयारी सुरू केली. जेव्हा माझे कुटुंबिय विरोध करत होते तेव्हा मला फक्त एक व्यक्ती माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे माझा नवरा. गेल्यावर्षी मी प्रथमच गुरगावच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळली होती आणि चौथी आली होती. आता माझ्या कठोर मेहनतीमुळे मला दुसऱयाच वर्षी मिस इंडियाचा मान मिळवता आला आहे. या विजेतेपदानंतर माझे सासरे खूप आनंदी झाले आहेत आणि ते नागपूरमध्ये नाचताहेत. त्यांना आता माझा अभिमान वाटू लागला आहे. आता माझ्या घरची परिस्थिती बदलली आहे. त्याचप्रमाणे आपल्या लोकांचीही मानसिकता लवकरच बदलेल, असा विश्वास कांची आडवाणीने विजयानंतर बोलताना व्यक्त केला.

 

भारत श्री 2018 स्पर्धेचा निकाल

महिला शरीरसौष्ठव - 1. कांची आडवाणी (महाराष्ट्र अ), 2. ममता देवी यमनम (दिल्ली), 3. गीता सैनी (हरयाणा), 4. जमुना देवी (मणिपूर),  सरिता देवी (मणिपूर).

महिला स्पोर्टस् मॉडेल - 1. संजू (उत्तर प्रदेश), 2.सोनिया मित्रा (प. बंगाल), 3. अंकिता सिंग (कर्नाटक), 4. स्टेला गोडे (महाराष्ट्र अ), 5. मंजिरी भावसार(महाराष्ट्र अ).