पहिली कसोटी स्थगित
By Admin | Updated: November 30, 2014 02:03 IST2014-11-30T02:03:15+5:302014-11-30T02:03:15+5:30
फिलिप ह्युजच्या सन्मानार्थ ब्रिस्बेन येथे पुढील आठवडय़ात सुरू होणारा भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिली कसोटी स्थगित
फिलिप ह्युजला श्रद्धांजली : भारत -ऑस्ट्रेलिया सामना रद्द होण्याची शक्यता
अॅडिलेड : बाऊन्सर डोक्यावर आदळून दुर्दैवी अंत झालेला फिलिप ह्युजच्या सन्मानार्थ ब्रिस्बेन येथे पुढील आठवडय़ात सुरू होणारा भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवंगत खेळाडूला श्रद्धांजली म्हणून हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शेफिल्ड शील्ड सामन्याच्या
वेळी बाऊन्सर डोक्यावर आदळल्यानंतर गुरुवारी 25 वर्षाच्या ह्युजचे निधन झाले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबरपासून सुरू होणार होता; पण तो स्थगित करण्यात आला. ह्युजवर बुधवारी (दि. 3 डिसेंबर) मॅॅक्सविले येथे अंत्यसंस्कार होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. अंत्यसंस्काराला ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील खेळाडू
तसेच सहयोगी स्टाफ हजर
राहणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
सामन्याचे आयोजन कधी होईल, ही माहिती मात्र सीएने दिली
नाही. सामन्याचे तिकीट खरेदी करणा:यांना मात्र ते जपून ठेवण्यास सांगण्यात आले.
त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने सिडनी येथे पत्रकार परिषद घेतली. अत्यंत भावुक झालेल्या क्लार्कने ह्युजच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्याच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. भारतीय संघ सोमवारी ब्रिस्बेनकडे रवाना होणार असून, पहिला सामना झाला नाही, तर तीन दिवसांचा सराव सामना खेळण्याचा संघाचा विचार आहे. यानंतर अॅडिलेड येथे दुसरा सामना पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होईल. पहिला सामना रद्द झाल्यास बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका तीन सामन्यांची होईल. सराव सामनाही रद्द झाल्याने शनिवारी टीम इंडियाने अॅडिलेड ओव्हलवर दिवसभर सराव केला. भारतीय खेळाडूंनी काल ह्युजला श्रद्धांजली म्हणून दंडावर काळ्या फिती लावून मुख्य मैदानाचा वापर न करता सराव केला. ईशांतने संपूर्ण ताकदीनिशी सराव केला. ‘बाऊन्सरमुळे ह्युजचे निधन झाले तरी बाऊन्सर टाकण्यास हरकत नाही,’ असे तो म्हणाला. निकट भविष्यात बाऊन्सर क्रिकेटचा भाग बनेल, असेही ईशांतने संकेत दिले.
उमेश यादव आणि मोहंमद शमी यांनीही मारा केला; पण भुवनेश्वर आणि वरुण यादव यांनी सरावातून विश्रंती घेतली. पाच तास चाललेल्या या सराव सत्रत फिरकीपटू
आश्विन, कर्ण शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनीही मारा केला. रविवारीसुद्धा भारतीय खेळाडू नेटमध्ये घाम गाळणार आहेत. (वृत्तसंस्था)
ही अपरिमित हानी असल्याने ह्युजच्या सहका:यांना आम्ही अंत्यसंस्कारांच्या एक दिवसानंतर कसोटी खेळण्यास बाध्य करू शकत नाही. खेळाडूंच्या हिताला आमचे प्राधान्य आहे. शोकाकुल स्थितीत अत्यंत दबावाचा 5 दिवसांचा सामना खेळण्याचे धैर्य खेळाडूंमध्ये नाही. आम्ही कठीण समयी साथ देणा:या बीसीसीआयचे कौतुक करतो.
- जेम्स सदरलँड, सीएचे सीईओ
पहिली कसोटी 5 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता असून, ती 5 दिवसांचीच असेल. दुसरीकडे, विश्वसनीय सूत्रंनी सांगितले, की ऑस्ट्रेलिया संघ आणि चाहत्यांमध्ये असलेल्या दु:खद भवना लक्षात घेता, हा सामना रद्द होऊ शकतो, असे सीएने म्हटले आहे. अंतिम निर्णय रविवारी होईल.
- डॉ. आर. एन. बाबा, भारतीय संघाचे प्रवक्ते
संघाची अवस्था शब्दांत व्यक्त करणो कठीण : क्लार्क
फलंदाज फिलिप ह्युजच्या निधनामुळे व्यथित झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या वेदना शब्दांत व्यक्त करणो कठीण असल्याचे मत कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त केले. क्लार्क स्वत: जखमी आहे; पण खेळाडूंचे दु:ख मांडताना त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या. अडीच मिनिटांच्या वक्तव्यात क्लार्क प्रत्येक शब्दानंतर अश्रू पुसत राहिला. तो म्हणाला, ‘‘एक संघ म्हणून आम्हाला काय वाटते, हे शब्दांत मांडणो कठीण जात आहे.
ह्युज आनंदी स्वभावाने सहका:यांसोबत खेळायचा. तुम्ही कुठेही असा; पण देशासाठी खेळत राहा, असा ह्युजचा मूलमंत्र होता. आम्ही त्याच्या ओठांवरील हसू आणि डोळ्यांतील चमक नेहमी स्मरणात ठेवू. ह्युजचे 64 क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय टी
शर्ट रिटायर्ड केले जाऊ
शकते, असे मी सहका:यांना सांगितले तेव्हा सर्वानी ते
मान्य केले.
आमची ड्रेसिंग रुम पूर्वी सारखे आता राहणार नाही. आमच्या सर्वाचे त्याच्यावर प्रेम होते, व पुढेही ते कायम राहणार आहे. संघातील खेळाडू खेळण्याच्या मनस्थितीत नसल्याने ब्रिसबेन येथे होणारी पहिली कसोटी रद्द केली पाहिजे. फिलच्या काही गोष्टी आम्ही कधीच विसरू शकणार नाही. स्वत:मध्ये सुधारणा करण्याचे त्याचे प्रयत्न हे आम्हाला कायमचेच स्मरणात राहणार आहे.