पावसामुळे पहिला क्वालिफायर स्थगित

By Admin | Updated: May 28, 2014 04:04 IST2014-05-28T04:04:12+5:302014-05-28T04:04:12+5:30

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यादरम्यान मंगळवारी येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणारा पहिला क्वालिफायर सामना पावसाच्या व्यत्ययामुळे स्थगित करण्यात आला.

First qualifier postponed due to rain | पावसामुळे पहिला क्वालिफायर स्थगित

पावसामुळे पहिला क्वालिफायर स्थगित

कोलकाता : आयपीएलच्या सातव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यादरम्यान मंगळवारी येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणारा पहिला क्वालिफायर सामना पावसाच्या व्यत्ययामुळे स्थगित करण्यात आला. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही लढत बुधवारी सायंकाळी ४ पासून प्रारंभ होणार आहे. कोलकातामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पंचांनी मंगळवारी सव्वापाच वाजताच्या सुमारास मैदानाची पाहणी केली आणि क्युरेटरसोबत चर्चा केली. त्यानंतर पंचांनी मैदान खेळण्यायोग्य नसल्याचे जाहीर करीत सामना होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुणतालिकेत पंजाब संघ अव्वल स्थानावर असल्यामुळे त्यांचे पारडे वरचढ आहे. त्यामुळे कोलकाता संघाला पराभव स्वीकारावा लागला, तर त्यांच्याकडे अंतिम फेरी गाठण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध आहे. त्यांना ३० मे रोजी होणार्‍या दुसर्‍या क्वालिफायर लढतीत खेळण्याची संधी मिळेल. (वृत्तसंस्था)

Web Title: First qualifier postponed due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.