असा विक्रम करणारा जडेजा ठरला पहिला भारतीय
By Admin | Updated: January 22, 2017 18:25 IST2017-01-22T18:25:59+5:302017-01-22T18:25:59+5:30
अष्टपैलू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवा किर्तीमान केला आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या जडेजाने आपल्या 129 व्या सामन्यात १५० बळी पूर्ण केले आहे.

असा विक्रम करणारा जडेजा ठरला पहिला भारतीय
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 22 - अष्टपैलू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवा किर्तीमान केला आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या जडेजाने आपल्या 129 व्या सामन्यात १५० बळी पूर्ण केले आहे. डाव्या हाताने स्वींग गोलंदाजी करताना 150 बळी घेणारा जडेजा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
कोलकाता येथील इडन गार्डनवर सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(65) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. जेनिंग्जला बाद करताच जडेजाच्य़ा नावे या विक्रमाची नोंद झाली. 6 फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध जडेजाने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्य़े जडेजाच्या नावे 111 विकेट आहेत.