वर्षाचा पहिला ग्रँडस्लॅम कुणाकडे ?
By Admin | Updated: January 30, 2015 00:55 IST2015-01-30T00:55:50+5:302015-01-30T00:55:50+5:30
वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरण्यासाठी जगातील दोन अव्वल महिला टेनिसपटू सज्ज झाल्या आहेत.

वर्षाचा पहिला ग्रँडस्लॅम कुणाकडे ?
मेलबोर्न : वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरण्यासाठी जगातील दोन अव्वल महिला टेनिसपटू सज्ज झाल्या आहेत. अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि दुसरी मानांकित रुसची मारिया शारापोवा यांच्यात महिला एकेरीच्या जेतेपदाची लढत होणार आहे.
सध्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असलेल्या सेरेनाने सेमीफायनलमध्ये व्हीनसला बाहेर करणाऱ्या अमेरिकेच्याच मॅडिसनचा ७-६, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मारियाने रुसच्याच एकातेरिना माकारेवाचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-२ असा पराभव केला आणि चौथ्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
२००८ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावणारी सेरेना तीन वर्षांत पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. तिने ८७ मिनिटे चाललेल्या या लढतीत माकारेवाचा पराभव केला. तिला फायनलमध्ये कडवे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सेरेनाने गेल्या १५ लढतींत मारियाला पराभवाची चव चाखवली आहे. शारापोवाने केवळ दोन वेळाच सेरेनाचा पराभव केला असून, त्यात विम्बल्डन आणि २०१४च्या सत्राचा अखेरचा टुअर चॅम्पियनशिपचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)