क्रोएशिया येथे सुरू असलेल्या पॅरी नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने ( Swaroop Unhalkar ) भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्ण आणि स्वरुपचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक ठरले. स्वरूपने R1 पुरुष १० मीटर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात २४५.९ गुणांची कमाई करून सुवर्णपदकावर नाव कोहले. त्याने हंगेरी व स्लोव्हाकियाच्या नेमबाजांवर बाजी मारली. हंगेरीचा रेस्किकने २४५ गुण, तर स्लोव्हाकियाचा मॅलेनोने २२३.७ गुणांची कमाई करून अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक निश्चित केले.
कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने इतिहास घडविला; वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी जिंकले 'सुवर्ण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:45 IST