शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पहिल्या दिवशी तामिळनाडूची आघाडी, खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:56 IST

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली.

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली. यात सी. प्रवीण याने १७ वर्षांखालील मुलांच्या तिहेरी उडीत मिळवलेले सुवर्णपदक उल्लेखनीय ठरले. महाराष्ट्राने दोन पदके मिळवली. ही दोन्ही पदके १५०० मीटर धावण्याच्या मुलींच्या गटातील आहेत. प्रगती मुलाने हिने रौप्य तर पल्लवी जगदाळे हिने कांस्यपदक मिळवले.

नवी दिल्ली येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर स्पर्धेला मोठ्या उत्साहाने बुधवारपासून सुरुवात झाली. उत्तर प्रदेशच्या सचिन गुज्जर आणि आकाश एम. व्हर्गिस यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकाविले. केरळ आणि उत्तर प्रदेश यांनी प्रत्येकी तीन पदके  मिळवली. आठवडाभर चालणा-या या १७ वर्षांखालील स्पर्धेत एकूण १६ खेळांचा समावेश आहे. त्यात १९९ सुवर्ण, १९९ रौप्य आणि २७५ कांस्यपदकांचा समावेश आहे. तळागाळातील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य शोधून काढण्यासाठी खेलो इंडिया या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.  

महाराष्ट्राच्या मुलींची चमक पहिल्या दिवशी महाराष्ट्रने दोन पदकांची कमाई करीत चमक दाखवली. हे दोन्ही पदके १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळाली आहेत. नाशिक येथील भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या प्रगती मुलाने हिने ४:५२:५१ मिनिटांचा वेळ देत रौप्यपदक पटकाविले. तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. पंढरपूर-सोलापूर येथील भैरवनाथ विद्यालयाच्या पल्लवी जगदाळे हिने ४:५९:०२ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवून दिले. 

टॅग्स :Sportsक्रीडा