‘गोल लाईन तंत्रा’चा पहिला लाभ फ्रान्सला
By Admin | Updated: June 17, 2014 04:09 IST2014-06-17T04:09:14+5:302014-06-17T04:09:14+5:30
माजी विजेत्या फ्रान्सने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या होंडुरासला रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ३-० ने नमविले

‘गोल लाईन तंत्रा’चा पहिला लाभ फ्रान्सला
पोर्टो अलेग्रो : माजी विजेत्या फ्रान्सने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या होंडुरासला रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ३-० ने नमविले. याच सामन्यात ‘गोल लाईन तंत्रा’द्वारे पहिला ऐतिहासिक गोल नोंदविण्याचे श्रेयदेखील फ्रान्सला मिळाले. करीम बेनजेमा सामन्याचा हिरो ठरला. त्याने ४५ आणि ७२ व्या मिनिटांना दोन गोल केले.
बेनजेमा याने पेनल्टीवर फ्रान्सचा पहिला गोल केला. विल्सन पलासियोस याने पॉल पोगबा याला दोनदा खाली पाडल्यामुळे दोन ‘यलो कार्ड’ दखवताच विल्सनला मैदान सोडावे लागले. उत्तरार्धात तीन मिनिटांचा खेळ होत नाही, तोच जर्मनीने विकसित केलेल्या ‘गोल लाईन तंत्राचा’ पावर करावा लागला.
बेनजेमाने गोलजाळीच्या दिशेने मारलेला चेंडू परत आला. हा चेंडू होंडुरासचा गोलकिपर नोएल वालाडारेस याच्या शरीराला स्पर्श करण्यापूर्वीच गोलजाळीत गेला होता. वालाडारेसने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण ब्राझीलचे रेफ्री सांड्रो रिची यांनी गोल लाईनचा वापर करण्याचा इशारा केला. होंडुरासने त्यांना जबर विरोध केला. पण, फ्रान्सला हो गोल बहाल करण्यात आला, तर वालाडारेस याच्या नावावर या आत्मघातकी गोलची नोंद झाली. सात व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या मदतीने हा गोल असल्याचे निष्पन्न झाले. बेनजेमा याने या गोलसाठी मेहनत घेतली. तिसरा गोल ७२ व्या मिनिटाला त्यानेच केला.
या विजयानंतर फ्रान्स ई गटात स्वित्झर्लंडला मागे टाकून वर आला. स्वित्झर्लंडने इक्वाडोरचा २-१ ने पराभव केला होता. हे दोन्ही संघ शुक्रवारी परस्परांविरुद्ध झुंज देणार आहेत. सामन्याची सुरुवात झाली तेव्हा खेळावर फ्रान्सचे वर्चस्व होते. १५ व्या मिनिटाला फ्रान्सचा मिडफिल्डर ब्लेसी याला संधी होती, पण प्रतिस्पर्धी गोलकिपर वालाडारेस यांचा उत्कृष्ट बचाव केला. यानंतर अॅन्थोनी ग्रिजमॅन आणि बेनजेमा यांचीही संधी हुकली. (वृत्तसंस्था)