वसीम अक्रमवर कराचीत गोळीबार
By Admin | Updated: August 5, 2015 23:41 IST2015-08-05T23:41:30+5:302015-08-05T23:41:30+5:30
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमच्या कारवर कराचीतील करसाज भागात दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात अक्रम बचावला. त्याला कोणतीही जखम झाली नाही

वसीम अक्रमवर कराचीत गोळीबार
कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमच्या कारवर कराचीतील करसाज भागात दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात अक्रम बचावला. त्याला कोणतीही जखम झाली नाही.
पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज बुधवारी एका गोलंदाजी शिबीरात सहभागी होण्यासाठी नॅशनल स्टेडिअममध्ये जात होता. त्यावेळी एका वाहनाने त्याच्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर अक्रम कारच्या बाहेर पडत असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी अक्रमला न लागता कारच्या चाकाला लागली.
अक्रमने सांगितले की, गोळी कारच्या टायरला लागली. त्या वाहनाचा नंबर नोट करून तो पोलिसांनाही दिला आहे.
अक्रमला कोणतीही धमकी देण्यात आली नव्हती, असेही त्याने स्पष्ट केले. अक्रमचा मॅनेजर अर्सलान हैदर म्हणाला की, वसीम स्वत: गाडी चालवत होता. त्याच्या कारला मागून धडक बसली आणि नंतर गोळीबार करण्यात आला. अक्रमने पोलीस हेल्पलाईनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपासही सुरू केला आहे.(वृत्तसंस्था)