क्रीडाग्राममध्ये आग, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुरक्षितस्थळी हलविले
By Admin | Updated: July 30, 2016 21:07 IST2016-07-30T21:07:55+5:302016-07-30T21:07:55+5:30
क्रीडाग्राममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंची व्यवस्था असलेल्या इमारतीला आग लागताच खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवावे लागले

क्रीडाग्राममध्ये आग, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुरक्षितस्थळी हलविले
>ऑनलाइन लोकमत -
रिओ, दि. 30 - ब्राझीलच्या रिओ शहरात ऑलिम्पिक सुरू होण्यास काहीच दिवस उरले असताना शनिवारी मोठा अनर्थ थोडक्यात टळला. क्रीडाग्राममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंची व्यवस्था असलेल्या इमारतीला आग लागताच खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
ऑस्ट्रेलियाचे पथक क्रीडाग्रामधील इमारतीत वास्तव्यास आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याने खेळाडूंना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ट्विटरवर लिहिले,‘इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली. आग खूप भीषण नव्हती. तथापि सर्वजण सुरक्षित असून कुठलीही प्राणहानी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाचे प्रवक्ते माईक टेनक्रेड म्हणाले,‘आग भीषण नसल्याने अग्निशमन विभागाने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. आता स्थिती नियंत्रणात आहे पण खेळाडू मात्र हॉटेलमध्येच आहेत.