जयरामचा पराभव करीत र्शीकांत स्वीस ओपनच्या फायनलमध्ये

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:39+5:302015-03-14T23:45:39+5:30

बासेल: भारताच्या किदांबी र्शीकांतने आज आपल्याच देशाच्या अजय जयराम याचा पराभव करीत 120000 डॉलर बक्षिसाच्या स्वीस ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े अव्वल मानांकित र्शीकांतने एका डावाच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 50 मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये जयरामचा 17-21, 21-15, 21-18 ने हरवल़े जागतिक चौथ्या क्रमांकाचा खेळाडू र्शीकांत उद्या होणार्‍या फायनलमध्ये श्यू सोंग आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात होणार्‍या दुसर्‍या उपांत्यफेरीतील विजेत्याशी लढणार आह़े भारताच्या दोन्ही खेळाडूंदरम्यान सेमीफायनलमध्ये जोरदार टक्कर पाहावयास मिळाली़ पहिल्या गेममध्ये एकेसमयी स्कोअर 6-6 अशी बरोबरीत होती़ त्यानंतर जयरामने सलग सहा गुणांसह 12-6 ने आघाडी घेतली आणि पुनश्च सहजतेने गेम जिंकला़ र्शीकांतने मात्र यानंतर पुनरागमन केल़े ज

In the final of the Swiss Open, | जयरामचा पराभव करीत र्शीकांत स्वीस ओपनच्या फायनलमध्ये

जयरामचा पराभव करीत र्शीकांत स्वीस ओपनच्या फायनलमध्ये

सेल: भारताच्या किदांबी र्शीकांतने आज आपल्याच देशाच्या अजय जयराम याचा पराभव करीत 120000 डॉलर बक्षिसाच्या स्वीस ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े अव्वल मानांकित र्शीकांतने एका डावाच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 50 मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये जयरामचा 17-21, 21-15, 21-18 ने हरवल़े जागतिक चौथ्या क्रमांकाचा खेळाडू र्शीकांत उद्या होणार्‍या फायनलमध्ये श्यू सोंग आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात होणार्‍या दुसर्‍या उपांत्यफेरीतील विजेत्याशी लढणार आह़े भारताच्या दोन्ही खेळाडूंदरम्यान सेमीफायनलमध्ये जोरदार टक्कर पाहावयास मिळाली़ पहिल्या गेममध्ये एकेसमयी स्कोअर 6-6 अशी बरोबरीत होती़ त्यानंतर जयरामने सलग सहा गुणांसह 12-6 ने आघाडी घेतली आणि पुनश्च सहजतेने गेम जिंकला़ र्शीकांतने मात्र यानंतर पुनरागमन केल़े जयरामने दुसर्‍या गेममध्येदेखील 5-2 ची आघाडी घेतली़ पुन्हा ही आघाडी 12-8 वर पोहोचवली; मात्र र्शीकांतने 12-12 च्या स्कोअरसह बरोबरी साधली़ र्शीकांतने सलग तीन गुणांची आघाडी घेतली़ पुन्हा गेम जिंकून लढतीला तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये नेल़े तिसर्‍या गेममध्ये र्शीकांतने चांगले प्रदर्शन करीत 12-6 ची आघाडी घेतली; मात्र जयरामने सलग सहा गुणांसह स्कोअर 12-12 असा केला़ र्शीकांतने धैर्याने खेळताना गेम 21-18 ने जिंकून सामना आपल्या नावे केला़

Web Title: In the final of the Swiss Open,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.