महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आज अंतिम सामने
By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:41+5:302014-08-31T22:51:41+5:30
नाशिक : येथील यशवंत व्यायामशाळेच्या वतीने आयोजित २५व्या शालेय व महाविद्यालयीन गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने उद्या होणार असून, आज अत्यंत चुरशीचे सामने पहावयास मिळाले.

महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आज अंतिम सामने
न शिक : येथील यशवंत व्यायामशाळेच्या वतीने आयोजित २५व्या शालेय व महाविद्यालयीन गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने उद्या होणार असून, आज अत्यंत चुरशीचे सामने पहावयास मिळाले. यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या दिवशी ज्युनियर गटामध्ये डी.डी. बिटको संघाने आर्मी स्पोर्ट्स स्कूलमध्ये अटीतटीची लढत झाली. यात बिटको संघाने विजय नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसर्या सामन्यात नाशिकरोड बिटको संघाने नॅशनल ज्युनियर महाविद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात नाशिकरोड बिटको महाविद्यालय व वाय. डी. बिटको महाविद्यालयाच्या संघाने अंतिमफेरी गाठली. वरिष्ठ गटात वीरेंद्र क्रीडा मंडळाने एचएएल संघाला पराभूत करून उपांत्यफेरी गाठली, तर दुसर्या सामन्यात नाशिकरोडच्या गणेश व्यायामशाळेने यशवंत व्यायामशाळा ब संघाला पराभूत करून उपांत्यफेरी गाठली. यशवंत व्यायामशाळा अ संघ व एचएएल संघानेही उपांत्यफेरी गाठली. १४, १७, १९ वर्षाआतील व वरिष्ठ गटाचे मुले-मुलींचे अंतिम सामने उद्या होणार असून, पारितोषिक वितरणाने स्पर्धेचा समारोप ४.३० वाजता होणार आहे. याचवेळी १९६८-७० पासूनच्या माजी व्हॉलीबॉल खेळाडूंना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संयोजक आनंद खरे यांनी दिली.