31 ऑगस्टला प्रो कबड्डीची फायनल!, पटना - जयपूर आमनेसामने
By Admin | Updated: July 29, 2016 22:43 IST2016-07-29T22:43:22+5:302016-07-29T22:43:22+5:30
प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत पटना पायरेट्सनं पुणेरी पलटनला आणि जयपूर पिंक पँथर्स ने तेलगू टायटनसचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

31 ऑगस्टला प्रो कबड्डीची फायनल!, पटना - जयपूर आमनेसामने
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 29 - प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत पटना पायरेट्सनं पुणेरी पलटनला आणि जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. जयपूर पिंक पँथर्स आणि पटना पायरेट्सदरम्यान 31 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये प्रो- कबड्डी 2016 चा अंतिम सामना होणार आहे.
दरम्यान, प्रो कबड्डीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पटना पायरटने पुणेरी पलटनचा 37-33 अशा फरकाने पराभव केला. तर जयपूर पिंक पँथर्सने दुसऱ्या उपांत्य फेरीत तेलुगू टायटन्सवर 10 गुणांनी मात करत अंतिम सामन्यात धडक मारली.