फिन
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30
हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिन

फिन
ह ट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिनमेलबोर्न : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिनने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अखेरच्या तीन चेंडूवर तीन बळी घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. विश्वकप स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील सातवा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील अखेरच्या तीन चेंडूवर त्याने ही कामगिरी केली. सर्वप्रथम त्याने यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनला (३१) डिप थर्डमॅनवर तैनात स्टुअर्ट ब्रॉडच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या चेंडूवर फिनने ग्लेन मॅक्सवेल (६६) याला लाँग ऑफवर तैनात जो रुटकडे झेल देण्यात भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर फिनने मिशेल जॉन्सनला बाद करीत हॅट्ट्रिक पूर्ण केली. जॉन्सनचा उडालेला झेल मिडऑफला तैनात जेम्स ॲन्डरसनने टिपला. फिनच्या हॅट्ट्रिकनंतरही इंग्लंडला या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून १११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)