झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया लढत

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:07+5:302014-08-31T22:51:07+5:30

झिम्बाब्वेने रचला इतिहास

Fighting Zimbabwe-Australia | झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया लढत

झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया लढत

म्बाब्वेने रचला इतिहास
तिरंगी मालिका : बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ३१ वर्षांनी मात, चिगुम्बराचे अर्धशतक
हरारे : गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर एल्टन चिगुम्बरा (नाबाद ५२) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या बळावर झिम्बाब्वेने नवा इतिहास रचताना तब्बल ३१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळविला़
या तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेचा तिसर्‍या सामन्यातील पहिला, तर ऑस्ट्रेलियाचा तिसर्‍या सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला़ झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात १९८ धावांनी झालेल्या पराभवाचा बदला घेत स्पर्धेच्या फायनलची आशा कायम राखली आहे़
झिम्बाब्वेने ९ जून १९८३ मध्ये तिसर्‍या वन-डे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळविला होता़ त्यानंतर ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी झिम्बाब्वे संघाला ३१ वर्षे आणि २८ सामन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली़
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ९ बाद २०९ धावांवर रोखले़ यानंतर ४८ षटकांत ७ बाद २११ धावा करीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली़ झिम्बाब्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या चिगुम्बरा याने आपल्या खेळीत ६८ चेंडूंचा सामना करताना ४ खणखणीत चौकार लगावले़
झिम्बाब्वेकडून ब्रेन्डन टेलर याने ३२, तर प्रॉस्पर उत्सेया याने नाबाद ३० धावा करताना संघाच्या विजयात योगदान दिले़ ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉन याने ४ गडी बाद केले, तर मिशेल स्टार्क याने २ आणि ग्लेन मॅक्सवेल याने १ बळी मिळविला़
त्याआधी ऑस्ट्रेलियाने मायकल क्लार्कचे (नाबाद ६८) आणि ब्रॅड हॅडीन ४९ आणि बेन कटिंग २६ धावांच्या बळावर ५० षटकांत ९ बाद २०९ धावांपर्यंत मजल मारली़ ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही़ झिम्बाब्वेकडून प्रॉस्पर उत्सेया, डोनाल्ड तिरीपनो आणि सिन विल्यम्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले़ (वृत्तसंस्था)

Web Title: Fighting Zimbabwe-Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.