फिफा विश्वचषक, ब्राझील १-० ने आघाडीवर

By Admin | Updated: July 5, 2014 02:33 IST2014-07-05T02:33:40+5:302014-07-05T02:33:40+5:30

फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील ब्राझील विरुद्ध कोलंबिया सामन्यात मध्यान्हापर्यंत ब्राझील १-० ने आघाडीवर आहे.

FIFA World Cup, Brazil lead 1-0 | फिफा विश्वचषक, ब्राझील १-० ने आघाडीवर

फिफा विश्वचषक, ब्राझील १-० ने आघाडीवर

>ऑनलाइन टीम
फोर्टेलेजा, दि.५ - फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील ब्राझील विरुद्ध कोलंबिया सामन्यात मध्यान्हापर्यंत ब्राझील १-० ने आघाडीवर आहे. ब्राझीलच्या थिएगो सिल्वाने सातव्या मिनीटाला गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली आहे. 
फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी ब्राझील विरुद्ध कोलंबिया यांच्यात सामना सुरु आहे.  सामन्यातील पहिल्याच कॉर्नर किकमध्ये नेमारच्या पासवर सिल्वाने गोल करुन ब्राझीलचे खाते उघडले. कोलंबियाच्या खेळाडूंनीही गोल करण्यासाठी अथक मेहनत घेतली. मात्र त्यांना आत्तापर्यंत फारसे यश मिळालेले नाही. मध्यान्हानंतर कोलंबियाची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असलेला कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज आणि ब्राझीलचा नेमार या दोघांनीही आत्तापर्यंत एकही गोल मारलेला नाही. नेमारने आत्तापर्यंत ४ तर रॉड्रिग्जने ५ गोल मारले आहेत. या सामन्यात नेमारने एक गोल मारल्यास तो गोल्डन बूटाच्या शर्यतीत अग्रस्थानावर येईल. 

Web Title: FIFA World Cup, Brazil lead 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.