फुटबॉल संस्कृतीला फिफाचा हात...
By Admin | Updated: July 26, 2015 23:58 IST2015-07-26T23:58:18+5:302015-07-26T23:58:18+5:30
महाराष्ट्रात फुटबॉल संस्कृती सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंच्या मेहनतीला न्याय देण्यासाठी फिफा आणि आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन

फुटबॉल संस्कृतीला फिफाचा हात...
मुंबई : महाराष्ट्रात फुटबॉल संस्कृती सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंच्या मेहनतीला न्याय देण्यासाठी फिफा आणि आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रासरुट फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये हे फेस्टिवल वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अंतर्गत होईल.
विफाचे सीईओ हेन्री मेनेझेस, विफाचे सेके्रटरी साउटर वाझ, आय लीगचे साईओ सुनांनदो धार यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने रविवारी कुलाबा येथील कुपरेज स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली. गेली तीन दिवस मुंबईत असलेल्या या शिष्टमंडळाने राज्यातील क्रीडा मंत्री, मुंबईतील नामांकित क्लब, आतंरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची भेट घेतली. आमदार आणि खासदारांनी आपल्या निधीतुन स्थानिक खेळाडूंसाठी मैदानांसह प्राथमिक गरजा पुर्ण केल्यास, भविष्यात महाराष्ट्रातील फुटबॉलचे चित्र वेगळे असेल, असे दक्षिण आणि मध्य आशियाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. शाजी प्रभाकरन यांनी सांगितले.
मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हे फेस्टिवल रंगणार आहे. या फेस्टिवलच्या माध्यामाने सप्टेंबरमध्ये कार्यशाळेचे आयोजन होईल. तसेच महाराष्ट्रासाठी फुटबॉल टेक्निकल आॅफिसर या नव्या पदासाठी लवकरच नियुक्ती देखील होईल. फुटबॉल संस्कृती वाढवण्यासाठी या आठ जिल्ह्यांंध्ये प्रशिक्षण सेंटर उभारण्यात येतील. फुटबॉल प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमधील कोणत्याही ४ तालुक्यांमध्ये असे प्रशिक्षण सेंटर उभारणार असल्याची माहिती यावेळी दिली. आज महाराष्ट्रत फुटबॉलची अवस्था दयनीय आहे. खेळाडूंना प्राथमिक सोयी-सुविधा मिळत नसल्याची खंत, यावेळी त्यांनी व्यक्त केली. येत्या काही महिन्यात विभागीय स्पर्धांमधून गुणवान खेळाडूंना संधी उपलब्ध करुण देणार असल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले.
(क्रीडा प्रतिनिधी)