डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान फिफा निवडणूक शक्य
By Admin | Updated: June 13, 2015 00:54 IST2015-06-13T00:54:38+5:302015-06-13T00:54:38+5:30
भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांचा सामना करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) निवडणूक आगामी डिसेंबर ते पुढील

डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान फिफा निवडणूक शक्य
झुरिच : भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांचा सामना करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) निवडणूक आगामी डिसेंबर ते पुढील वर्षीच्या फेब्रुवारीदरम्यान कधीही होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अध्यक्ष सॅप ब्लाटर यांनी गेल्या आठवड्यात पदाचा राजीनामा दिला होता. तारखांची निश्चिती कार्यकारिणी बैठकीत होणार असल्याची माहिती फिफाच्या प्रवक्त्याने दिली. यासाठी २० जुलै रोजी विशेष कार्यकारिणी
बैठकीचे आयोजन झुरिच येथे होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
झुरिच येथील एका हॉटेलमध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली फिफाच्या
७ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ब्लाटर
यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत, मात्र ते पदावर कायम राहतील. (वृत्तसंस्था)