शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Fifa Bans Indian Football Federation: भारतीय फुटबॉलसाठी काळा दिवस! फिफाने बंदी घातली, प्रफुल्ल पटेल मूळ कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:24 IST

Fifa Bans IFF: सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर देशातील फुटबॉलचे कामकाज प्रशासकीय समिती (CoA) पाहत आहे. फिफा भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे आणि सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

एकीकडे क्रिकेटद्वारे अवघ्या जगावर राज्य करत असलेल्या भारतासाठी फुटबॉलमध्ये आजचा काळा दिवस उजाडला आहे. फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली आहे. यामुळे जोवर हा बॅन उठविला जात नाही, तोवर भारतीय फुटबॉल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नाही. यापेक्षा मोठा धक्का म्हणजे महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता, तो देखील फिफाने हिसकावून घेतला आहे. 

तिसऱ्या पक्षाने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे कारण देत फिफाने सोमवारी रात्री हा कठोर निर्णय घेतला. भारतीय महासंघावरील बॅन आता तात्काळ प्रभावाने लागू होत असल्याचे फिफाने म्हटले आहे. "एआयएफएफ (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) ने आपली कार्यकारिणी जाहीर केली तरच हे निलंबन मागे घेण्यात येईल.'', असे फिफाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर देशातील फुटबॉलचे कामकाज प्रशासकीय समिती (CoA) पाहत आहे. फिफा भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे आणि सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

प्रफुल्ल पटेल कारण? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2022 मध्ये पदावरून काढून टाकेपर्यंत ते अध्यक्ष होते. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती ३ पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या संगनमताने निवडणुका होऊ देत नाहीएत, असा आरोप आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस