फिकरूची कमाल; अॅटलेटिकोचा दुसरा विजय
By Admin | Updated: October 17, 2014 02:36 IST2014-10-17T02:36:48+5:302014-10-17T02:36:48+5:30
स्ट्रायकर फिकरू टफेराच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सौरव गांगुलीच्या अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी दुस:या विजयाची नोंद केली.

फिकरूची कमाल; अॅटलेटिकोचा दुसरा विजय
गुवाहाटी : स्ट्रायकर फिकरू टफेराच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सौरव गांगुलीच्या अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी दुस:या विजयाची नोंद केली. अॅटलेटिकोने जॉन अब्राहमच्या नॉर्थ इस्ट युनायटेडवर 2-क् अशी मात करीत आघाडीस्थान कायम ठेवले आहे.
इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अॅटलेटिको संघाने पूर्वार्धापासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या विजयामुळे नॉर्थ इस्ट संघही बहरात होता. मात्र, पहिल्या पंधराव्याच मिनिटाला फिकरू टफेरा (इथोपिया) ने हवेत उलटी उडी घेत गोल नोंदवित संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली.
टफेरा ज्या पद्धतीने गोल नोंदविला तो उपस्थित प्रेक्षकांना अद्भूत असाच होता. गोल नोंदविल्यानंतर स्टेडियममध्ये
सन्नाटा पसरला होता. त्यानंतर अधिकतर चेंडू अॅटलेटिको संघाच्या खेळाडूंकडे होता. त्यातूनही
नॉर्थ इस्टच्या खेळाडूंनी आक्रमणो करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
नार्थ इस्टने उत्तरार्धात चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अॅटलेटिको संघाची बचावफळी भेदू शकत नव्हते. अखेर 73 व्या मिनिटाला केपडेव्हिलाने दिलेल्या पासवर जेम्स किनेने चेंडू स्कूप करीत जाळीमध्ये घातला.
मात्र, त्यावेळी पंचाने ऑफसाईड दिली. त्यावेळी नॉर्थ इस्टचे खेळाडूही या निर्णयावर नाराज झाले. त्यानंतर नॉर्थ इस्टला अॅटलेटिकोच्या खेळाडूंनी थोपवून धरण्याचेच काम केले. नॉर्थ इस्टच्या खेळाडूंनी छोटय़ा-छोटय़ा पासेसवर दिलेला भर त्यांना फलदायी ठरला नाही.
अतिरिक्त पाच मिनिटाच्या वेळेत गोव्याचा आणि अॅटलेटिकोकडून खेळणारा खेळाडू डेंङिाल फ्रँकोने दिलेल्या पासवर जॉको पॉडनी (ङोक प्रजासत्ताक) याने सहजपणो नार्थ इस्टच्या गोलरक्षकाला चकवित गोल (9क्+2) नोंदविला.
यलो आणि रेडही
या सामन्यात अॅटलेटिका संघाला चांगलाच फटका बसला. त्यांचा मिडफिल्डर बोर्जा फर्नाडिस (स्पेन) याला पंचांनी 54 मिनिटाला यलो (पिवळे) आणि 84 व्या मिनिटाला रेड (लाल) कार्ड दाखविण्यात आले. 84 व्या मिनिटाला त्याने नॉर्थ इस्टच्या एल. यानेसला (कोलंबिया) हाताने अडवून पाडले होते.