फर्डिनेंडने सोडली मँचेस्टरची साथ
By Admin | Updated: May 14, 2014 02:12 IST2014-05-13T19:00:41+5:302014-05-14T02:12:00+5:30
स्टार डिफेंडर रिओ फर्डिनेंड याने जगातील प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली आहे.

फर्डिनेंडने सोडली मँचेस्टरची साथ
लंडन : स्टार डिफेंडर रिओ फर्डिनेंड याने जगातील प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली आहे. कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे १२ वर्षांपासून क्लबकडून खेळणारा फर्डिनेंडने हा निर्णय घेतला आहे़
३५ वर्षीय फर्डिनेंड याचा सध्याच्या कराराचा अवधी लवकरच संपणार आहे, तरी सुद्धा मँचेस्टर क्लबने नवीन कराराचा प्रस्ताव ठेवलाच नाही़ त्यामुळे त्याने हा क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याने मँचेस्टरसाठी ४५४ सामने खेळले आहेत़ त्यात त्याने ८ गोल नोंदविले आहेत़
इंग्लंडचा फर्डिनेंड म्हणाला, लहानपनापासून या क्लबकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते़ ते पूर्ण झाले याचा विशेष आनंद आहे़ मात्र, मला मनासारखा निरोप घेता आला नाही, याची खंत आहे, असे असले तरीही ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या यशात योगदान दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे़
दरम्यान, मँचेस्टर युनायटेडने फर्डिनेंडने दिलेल्या योगदानामुळे क्लब लिजेंड म्हणून क्लबशी जुडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे़ विशेष म्हणजे क्लबचे अनेक माजी खेळाडू क्लब लिजेंड म्हणून क्लबशी जुडलेले आहेत़
फर्डिनेंडला मँचेस्टर युनायटेडने २००२ मध्ये तीन कोटी पाऊंडमध्ये खरेदी केले होते़ हा त्यावेळचा एक विक्रम होता़ फर्डिनेंड याने मँचेस्टरकडून आपला पहिला सामना ऑगस्ट २००२ ला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळला होता़ गत रविवारी ईपीएलच्या सत्रातील अखेरच्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड क्लब विरुद्ध मँचेस्टरकडून त्याचा अखेरचा सामना होता़
विशेष म्हणजे मँचेस्टरकडून खेळताना फर्डिनेंडला सुरुवातीला विशेष कामगिरी करता आली नव्हती़ मात्र, २००२-०३ मध्ये प्रीमिअर लीगमध्ये किताब जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती़ सप्टेंबर २००३ मध्ये एक ड्रग्ज टेस्ट न केल्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती़