जनक टेकाळे यांचा सत्कार

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30

सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाच्या उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेले जनक टेकाळे यांचा सोलापुरातील क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला़ मूळचे उस्मानाबादचे रहिवासी असलेले टेकाळे यांनी 1993-1998 साली सोलापुरात जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आह़े 1998 ते 2003 दरम्यान पुणे येथे क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 2003 ते 2007 दरम्यान पुणे येथे सहसंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली़ 2007 ते 2011 दरम्यान लातूर विभागाच्या उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली़ 2011 ते 2015 दरम्यान बालेवाडी क्रीडापीठ व पुणे येथे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिल़े त्यांनी 2008 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशिया अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आह़े

Felicitated Janak Takale | जनक टेकाळे यांचा सत्कार

जनक टेकाळे यांचा सत्कार

लापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाच्या उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेले जनक टेकाळे यांचा सोलापुरातील क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला़ मूळचे उस्मानाबादचे रहिवासी असलेले टेकाळे यांनी 1993-1998 साली सोलापुरात जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आह़े 1998 ते 2003 दरम्यान पुणे येथे क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 2003 ते 2007 दरम्यान पुणे येथे सहसंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली़ 2007 ते 2011 दरम्यान लातूर विभागाच्या उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली़ 2011 ते 2015 दरम्यान बालेवाडी क्रीडापीठ व पुणे येथे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिल़े त्यांनी 2008 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशिया अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आह़े सोलापुरात असताना त्यांनी क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षक, संघटक यांना एकत्रित आणून क्रीडा विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आह़े कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या अपूर्ण राहिलेल्या बांधकामासाठी आणि नेहरूनगर येथील शासकीय मैदानाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जनक टेकाळे यांनी यावेळी बोलताना सांगितल़े
यावेळी र्शीकांत शेटे, राष्ट्रीय खेळाडू सृष्टी शेटे, क्रीडा संघटक अनिल पाटील, प्रकाश काटोळे, प्रकाश काशीद, प्रकाश भुतडा, टेकाळे आदी उपस्थित होत़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Felicitated Janak Takale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.