प्रिव्ू
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:55+5:302015-01-23T01:05:55+5:30
ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार

प्रिव्ू
ऑ ्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धारतिरंगी मालिका : इंग्लंडविरुद्ध लढत आजहोबर्ट : कर्णधार जॉर्ज बेलीसह तीन प्रमुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तिंरगी मालिकेत इंग्लडविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पहिल्या दोन्ही लढतीत विजय मिळविणारा यजमान संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाला शुक्रवारच्या लढतीत कर्णधार जॉर्ज बेलीची उणीव भासणार आहे. भारताविरुद्धच्या लढतीत संथ षटकगतीसाठी बेलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मॅच फिटनेसच्या कारणास्तव शेन वॉटसन व डेव्हिड वॉर्नर यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. इंग्लंडला पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, पण त्यानंतर त्यांनी भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने आणखी एक विजय मिळविला तर १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी त्यांचे स्थान पक्के होईल. प्रभारी कर्णधार स्टिव्हन स्मिथ कसोटी मालिकेतील शानदार फॉर्म वन-डे मालिकेतही कायम राखण्यास उत्सुक आहे.भारताविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून यजमान संघातील नियमित खेळाडूंच्या अनुपस्थिचा लाभ घेण्यास इंग्लंड संघ प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या स्थानी शॉन मार्शचा तर वॉटसनच्या स्थानी कॅमरुन व्हाईटचा संघात समावेश करण्यात आला आहे. मिशेल मार्शलाही या लढतीत संधी मिळते का? याबाबत उत्सुकता आहे. भारताविरुद्धच्या लढतीत इंग्लंडच्या फलंदाजांनी नैसर्गिक फलंदाजी केली, पण केवळ १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असल्यामुळे त्यांच्यावर कुठलेही दडपण नव्हते. स्टिव्हन फिनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मात्र उसळी मिळणाऱ्या व मायदेशतील खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याचे आव्हान राहणार आहे. फिरकीपटू मोईन अली ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजण्याची शक्यता आहे. मोईनने फिरकीपटूंविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा संघ अशी ओळख असलेल्या भारताविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. फिनने भारताविरुद्ध पाच बळी घेतले असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत तो कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. त्याची साथ देण्यासाठी जेम्स ॲन्डरसन सज्ज आहे. ॲन्डरसनने भारताविरुद्ध चार बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)