‘फेडेक्स’चा ‘जोको’ला धक्का

By Admin | Updated: November 19, 2015 04:46 IST2015-11-19T04:46:32+5:302015-11-19T04:46:32+5:30

स्वित्झर्लंडचा बलाढ्य रॉजर फेडररने जागतिक टेनिसमधील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला नमवून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये

FedEx's push to Zoko | ‘फेडेक्स’चा ‘जोको’ला धक्का

‘फेडेक्स’चा ‘जोको’ला धक्का

लंडन : स्वित्झर्लंडचा बलाढ्य रॉजर फेडररने जागतिक टेनिसमधील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला नमवून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये जागा निश्चितक केली.
या शानदार विजयासह फेडररने अग्रमानांकीत जोकोच्या सलग २३ विजयी सामन्यांची मालिका खंडीत केली. अटीतटीचा झालेल्या पहिल्या सेटमध्ये बाजी मारुन फेडररने आघाडी घेतली आणि त्यानंतर तुफान आक्रमण करताना जोकोला पुनरागमनाची संधी न देता ७-५, ६-२ असा दिमाखदार विजय मिळवला. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमामध्ये जोकोला एकूण सहावेळा पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये तीन वेळा एकट्या फेडररने जोकोला नमवले आहे. या विजयासह फेडररने जोकोविरुध्द आपली कामगिरी २२-२१ अशी केली आहे.
दरम्यान, जोकोचे आव्हान अजूनही संपुष्टात आलेले नसून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बेर्दिचला नमवावे लागेल. सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये १२व्या गेमपर्यंत जोको सहज खेळत होता. मात्र यानंतर फेडररने आपला वेग वाढवला. यावेळी काहीसा थकलेल्या जोकोचा बॅकहँड शॉट नेटवर अडकला आणि फेडररने दुसऱ्या सेटमध्ये
२-० अशी आघाडी घेतली. सहा
वेळा या स्पर्धेत बाजी मारलेल्या फेडररने ५-२ अशी मजबूत आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या मॅच पॉइंटवर सामना जिंकला.(वृत्तसंस्था)

अशा प्रकारच्या गोष्टी सामन्यात होत असताता आणि मला ते मान्य करावे लागेल. रॉजरला त्याच्या खेळाचे श्रेय द्यावेच लागेल. मी सामन्यात अनेक चुका केल्या आणि त्यामुळेच रॉजरला सहजपणे विजय बहाल केला.
- नोव्हाक जोकोविच

Web Title: FedEx's push to Zoko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.