फेडररच्या नजरा डेव्हिसकप किताबवर
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:14+5:302014-09-11T22:31:14+5:30

फेडररच्या नजरा डेव्हिसकप किताबवर
>पॅरिस: 17 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर जेव्हा जिनिव्हामध्ये इटलीविरुद्ध डेव्हिसकपच्या उपांत्यफेरीत खेळेल तेव्हा स्वीत्झर्लंडला पहिल्यांदा या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचविणे हे उद्देश राहणार आह़े फेडरर आपल्या चमकदार कारकिर्दीमध्ये सर्व आघाडीचे किताब जिंकले आहेत; मात्र आतापर्यंत ऑलिम्पिक एकेरी सुवर्ण आणि डेव्हिस कप किताबापासून तो वंचित राहिला आह़े आपला सख्खा मित्र ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टान वावरिंकासोबत तो संघाला डेव्हिस कप मिळवून देऊ शकतो़ इटलीचा पराभव करीत स्वीत्झर्लंड 21 ते 23 नोव्हेंबरपर्यंत होणार्या फायनलमध्ये प्रवेश केल्यास त्याचा सामना फ्रान्स अथवा चेक गणराज्यशी होईल़