फेडररने जिंकले मियामी
By Admin | Updated: April 3, 2017 01:08 IST2017-04-03T00:42:03+5:302017-04-03T01:08:03+5:30
राफेल नदालचा ६-३, ६-४ असा फडशा पाडून मियामी ओपनचे दिमाखात विजेतेपद पटकावले.

फेडररने जिंकले मियामी
ऑनलाइन लोकमत
मियामी, दि. 3 - स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालचा ६-३, ६-४ असा फडशा पाडून मियामी ओपनचे दिमाखात विजेतेपद पटकावले. यंदाच्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन पटकावल्यापासून फेडररने सलग तिसरे जेतेपद जिंकले आहे, हे विशेष. दखल घेण्याची बाब म्हणजे या तीन विजेतेपदांपैकी दोन वेळा अंतिम सामन्यात फेडररने नदालला धूळ चारली आहे.
मियामी ओपनच्या निमित्ताने पुन्हा एकदा हायव्होल्टेज अंतिम सामन्याची मेजवानी टेनिसप्रेमींना मिळाली. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही फेडरर - नदाल आमनेसामने आले होते. त्यावेळी देखील फेडररने जबरदस्त खेळ करताना नदालचे तगडे आव्हान परतावले होते. दुखापतीतून सावरुन पुनरागमन केलेला फेडरर सध्या भलत्याच जोशमध्ये आहे.