दमदार विजयासह फेडरर तिस:या फेरीत

By Admin | Updated: August 31, 2014 02:18 IST2014-08-31T02:18:29+5:302014-08-31T02:18:29+5:30

17 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा स्वित्ङरलडच्या रॉजर फेडररने अपेक्षेनुरूप शानदार कामगिरी करताना यूएस ओपनची तिसरी फेरी गाठली आहे;

Federer Viadar: Third round in this round | दमदार विजयासह फेडरर तिस:या फेरीत

दमदार विजयासह फेडरर तिस:या फेरीत

न्यूयॉर्क : 17 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा स्वित्ङरलडच्या रॉजर फेडररने अपेक्षेनुरूप शानदार कामगिरी करताना यूएस ओपनची तिसरी फेरी गाठली आहे; परंतु महिला गटात व्हिनस विल्यम्स, सिमोना हालेप आणि एंजेलिक कर्बरसारख्या दिग्गजांना  पराभवाचा सामना करावा लागला.
द्वितीय मानांकित फेडररने ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करताना तिसरी फेरी गाठली. फेडररची पुढील फेरीतील लढत स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्स याच्याविरुद्ध होईल. ग्रेनोलर्सने दुस:या फेरीत 25 व्या मानांकित इवो कालरेविकचा 7-6, 6-7, 7-6, 3-6, 6-4 असा पराभव केला. सातव्या मानांकित दिमित्रोव्हने डुडी सेला याचा 6-1, 6-2, 6-2 असा, तर 19 व्या मानांकित फेलिसिआनो लोपेजने जपानच्या ततसुमा इटोचा संघर्षपूर्ण लढतीत 6-4, 3-6, 6-4, 7-6 असा पराभव केला. 
फ्लशिंग मिडोजमध्ये शुक्रवारी पहिल्या सनसनाटी निकालाची सुरुवात रोमानियाच्या सिमोना हालेपपासून सुरू झाली. 32 वर्षीय मिरजाना लुसिक बरोनी हिने द्वितीय मानांकित हालेप हिचा 7-6, 6-2 असा पराभव करीत चौथी फेरी गाठली. दोन वेळेसची चॅम्पियन आणि 19 वी मानांकित व्हिनस विल्यम्सचा इटलीच्या सारा इराणीने 6-क्, 6-क्, 7-6 असा सनसनाटी पराभव केला.  
दिग्गजांच्या पराभवाची मालिका येथेच थांबली नाही आणि सहाव्या मानांकित जर्मनीच्या एंजेलिक कर्बर हिलाही पराभवाची चव चाखावी लागली. कर्बरला स्वीस खेळाडू बेलिंडा बॅन्सिकने 6-1, 7-5 अशी धूळ चारली व अखेरच्या 16 जणांत प्रवेश मिळवला. अखेर दिग्गजांच्या पराभवाची मालिका पाचव्या मानांकित मारिया शारापोव्हाने रोखली. रशियाच्या शारापोव्हाने 26 व्या मानांकित जर्मनीच्या सबिन लिसिकी हिच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवला. महिलांच्या अन्य लढतीत   डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिने 18 व्या मानांकित जर्मनीच्या आंद्रिआ पेतकोव्हिकचा 6-3, 6-2 असा  पराभव केला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Federer Viadar: Third round in this round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.