जोकोव्हिचविरुद्ध फेडरर टशन
By Admin | Updated: July 5, 2014 04:24 IST2014-07-05T04:24:22+5:302014-07-05T04:24:22+5:30
विम्बल्डन पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोवाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांच्यात टशन रंगणार आहे.

जोकोव्हिचविरुद्ध फेडरर टशन
लंडन : विम्बल्डन पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोवाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांच्यात टशन रंगणार आहे.
सर्बियाच्या जोकोविचने ग्रिगोव दिमित्रोव्हचा ६-४, ३-६, ७-६, ७-६ असा पराभव करीत तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्याआधी २0११ मध्ये विम्बल्डनचा चॅम्पियन जोकोविच सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता; परंतु त्याने जबरदस्त झुंजार खेळ करताना बल्गेरियाच्या ११ व्या मानांकित प्रतिस्पर्ध्याला ३ तास २ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभूत केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत स्वीत्झर्लंडच्या फेडररने कॅनडाच्या मिलोस राओनिक याचा ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
जोकोविचने विजेतेपद जिंकल्यास तो सप्टेंबर २0१३ नंतर प्रथमच नदालकडून नंबर एकचा ताज हिसकावून घेईल. या लढतीत दिमित्रोवन जोकोला कडवी टक्कर दिली. जोकोविचने म्हटले, मी सुरुवात चांगली केली होती; परंतु नंतर त्याला मुसंडी मारण्याची संधी दिली. सामना कठीण होता आणि चौथा सेट कोणत्याही दिशेला जाऊ शकत होता; परंतु फायनलमध्ये पोहोचल्याने मी आनंदी आहे. ही लढत पाहण्यासाठी दिमित्रोव्हची गर्लफ्रेंड मारिया शारापोव्हादेखील प्लेअर्स बॉक्समध्ये उपस्थित होती. (वृत्तसंस्था)