फेडरर उपांत्य फेरीत

By Admin | Updated: April 1, 2017 01:05 IST2017-04-01T01:05:45+5:302017-04-01T01:05:45+5:30

रॉजर फेडररने संघर्षपूर्ण लढतीत टॉमस बर्डीच याला नमवीत येथे मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य

Federer in the semifinals | फेडरर उपांत्य फेरीत

फेडरर उपांत्य फेरीत

बिसकेन : रॉजर फेडररने संघर्षपूर्ण लढतीत टॉमस बर्डीच याला नमवीत येथे मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू चौथ्या मानांकित फेडररने उपांत्यपूर्व फेरीत बर्डीच याला ६-२, ३-६, ७-६ असे पराभूत केले.
फेडरर उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकावरील खेळाडू निक किर्गियोस याच्याशी दोन हात करील. किर्गियोस याने १६ व्या मानांकित अ‍ॅलेक्सांद्र ज्वेरेव्ह याचा ६-४, ६-७, ६-३ असा पराभव केला.
महिला एकेरीत १२ व्या मानांकित कॅरोलिन वोजनियाकी हिने द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिसकोव्हा हिचा ५-७, ६-१, ६-१ असा सहज पराभव करताना १0 प्रयत्नांत प्रथमच अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले.

Web Title: Federer in the semifinals