फेडरर सेमीफायनलमध्ये
By Admin | Updated: September 6, 2014 01:29 IST2014-09-06T01:29:01+5:302014-09-06T01:29:01+5:30
रॉजर फेडरर याने मोनफिल्सविरुद्ध 5 सेटर्पयत रंगलेल्या लढतीत शानदार विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़

फेडरर सेमीफायनलमध्ये
यूएस ओपन टेनिस : फ्रान्सच्या गेल मोनफिल्सवर संघर्षपूर्ण विजय
न्यूयॉर्क : स्वित्ङरलडचा आघाडीचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने लौकिकाला साजेसा खेळ करताना फ्रान्सच्या गेल मोनफिल्सविरुद्ध 5 सेटर्पयत रंगलेल्या लढतीत शानदार विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़
17 वेळा ग्रँडस्लॅमचा किताब आपल्या नावे करणा:या फेडररने पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 2क्वे मानांकनप्राप्त फ्रान्सच्या मोनफिल्सवर 4-6, 3-6,
6-4, 7-5, 6-2 अशा गुणफरकाने
मात करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़ फेडररला उपांत्य
फेरीच्या लढतीत आता क्रोएशियाच्या मारिन सिलिचशी सामना करावा लागेल़ या लढतीत फेडररची बाजू वरचढ मानली जात आह़े कारण यापूर्वी सिलिचविरुद्ध झालेल्या पाचही सामन्यांत फेडररने बाजी
मारली आह़े स्पर्धेत 14वे मानांकनप्राप्त सिलिचवर प्रतिबंधित औषधींचे सेवन केल्यामुळे बंदी घालण्यात आली होती़ त्यामुळे त्याला गेल्या वर्षी यूएस ओपन टेनिस स्पर्धेला मुकावे लागले होत़े मात्र, बंदी उठल्यानंतर सध्या सिलिच चांगलाच फॉर्ममध्ये आह़े त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ङोक प्रजासत्ताकाच्या सहावे मानांकनप्राप्त टॉमस बर्डीचला सरळ सेटमध्ये 6-2, 6-4, 7-6 अशी धूळ चारून उपांत्य फेरीत मजल मारली आह़े
दरम्यान, पुरुष गटातील
दुस:या सेमीफायनलमध्ये शनिवारी जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना जपानच्या केई निशिकोरीशी होणार आह़े जोकोविच सलग आठव्यांदा यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आह़े जोकोविच आणि निशिकोरी आतार्पयत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यांपैकी एक
सामना जोकोविचने, तर निशिकोरीने एका लढतीत बाजी मारली
आह़े (वृत्तसंस्था)