इतिहास रचण्यास फेडरर सज्ज
By Admin | Updated: July 12, 2015 03:54 IST2015-07-12T03:54:44+5:302015-07-12T03:54:44+5:30
रॉजर फेडरर जर उद्या आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकला तर तो आधुनिक युगात सर्वात वयस्कर चॅम्पियन बनेल; परंतु त्यासाठी त्याला जागतिक

इतिहास रचण्यास फेडरर सज्ज
लंडन : रॉजर फेडरर जर उद्या आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकला तर तो आधुनिक युगात सर्वात वयस्कर चॅम्पियन बनेल; परंतु त्यासाठी त्याला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचे आव्हान यशस्वीपणे पेलावे लागणार आहे.
३३ वर्षीय फेडररने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देताना फायनलमध्ये धडक मारली आहे. गेल्या वर्षी जोकोविचने पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत त्याला पराभूत केले होते. तो दहाव्यांदा विम्बल्डन फायनलमध्ये पोहोचला आहे आणि केन रोसवेलनंतर ही कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. रोसवेलने १९७४ मध्ये ३९ व्या वर्षी ही कामगिरी केलेली आहे. (वृत्तसंस्था)
नोव्हाक हा शानदार खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोठेही खेळण्यास मजाच येते. त्याने मोठे यश प्राप्त केले आहे. हार्डकोर्टवर त्याचा दबदबा राहिला आहे आणि ग्रासकोर्टवरही त्याची कामगिरी विशेष होत आहे.
- फेडरर