फेडररकडून मरे आऊट
By Admin | Updated: November 15, 2014 01:06 IST2014-11-15T01:06:22+5:302014-11-15T01:06:22+5:30
द्वितीय मानांकित स्वीत्ङरलडचा रॉजर फेडररने इंग्लंडच्या अँडी मरेवर दणदणीत विजय मिळवताना त्याचे आव्हान संपुष्टात आणले.

फेडररकडून मरे आऊट
लंडन : सातव्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल जिंकण्यासाठी खेळत असणा:या जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित स्वीत्ङरलडचा रॉजर फेडररने इंग्लंडच्या अँडी मरेवर दणदणीत विजय मिळवताना त्याचे आव्हान संपुष्टात आणले.
वर्षाच्या अखेरीस होणा:या या स्पर्धेत सलग विक्रमी 13व्यांदा पात्र ठरलेल्या फेडररने आपल्या अनुभवाचा पूर्ण लाभ उठवताना अँडी मरेचा 56 मिनिटांत 6-0, 6-1 असा पराभव करीत त्याला स्पर्धेतून आऊट केले.
हा मरेचा कारकिर्दीतील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी मियामी येथे 2007 मध्ये मरे याला नोव्हाक जोकोविचने 6-1, 6-0 असे पराभूत केले होते.
मरेची कामगिरी या हंगामात खूपच निराशाजनक ठरली आणि सहा वर्षात प्रथमच तो टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे. या वेळेस तो
एकही स्पर्धा जिंकू शकला नाही. दुसरीकडे 33 वर्षीय स्वीस खेळाडू फेडरर हा काराकिर्दीत 250 वेळेस इनडोअर सामने जिंकणारा नववा खेळाडू बनला आहे.
आशियाचा नंबर वन एकेरीचा खेळाडू आणि प्रथमच स्पर्धेसाठी पात्र ठरणा:या जपानच्या केई निशिकोरी यानेदेखील तीन सेटर्पयत रंगलेल्या लढतीत डेव्हिड फेररचा 4-6, 6-4, 6-1 असा पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)
17व्यांदा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिलेला फेडरर मरेवरील विजयाबरोबरच गटात अव्वल स्थानी आला आहे. त्याने त्याच्या गटातील तिन्ही सामने जिंकले असून, त्याची उपांत्य फेरीतील लढत जपानच्या निशिकोरीशी होईल.
सामन्यानंतर फेडरर म्हणाला, मी एक चांगला सामना खेळून खूश आहे. आधीच पात्र ठरल्यामुळे मी आधीच्या तुलनेत खूपच आरामात खेळत होतो.
33 वर्षीय स्वीस खेळाडू फेडरर हा काराकिर्दीत
250 वेळेस इनडोअर सामने जिंकणारा नववा खेळाडू बनला आहे.