फेडरर, नदाल, शारापोव्हाचा सहज विजय

By Admin | Updated: July 1, 2015 02:58 IST2015-07-01T02:58:02+5:302015-07-01T02:58:02+5:30

फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपद जिंकणारा स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, सात वेळचा विजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल, जपानचा नंबर वन खेळाडू व पाचवा मानांकित केई

Federer, Nadal, Sharapova easily win | फेडरर, नदाल, शारापोव्हाचा सहज विजय

फेडरर, नदाल, शारापोव्हाचा सहज विजय

लंडन : फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपद जिंकणारा स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, सात वेळचा विजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल, जपानचा नंबर वन खेळाडू व पाचवा मानांकित केई निशिकोरी, रशियाची मारिया शारापोव्हा आणि सध्याची महिला गटातील विजेती पेत्रा क्वितोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत
विजय नोंदवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित वावरिंकाने पोर्तुगालच्या जोओ सोसाला ६-२, ७-५, ७-६ असे पराभूत करून या वर्षीच्या आपल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने आगेकूच केली. पाचव्या मानांकित निशिकोरीने इटलीच्या सिमोन बोलेलीला चुरशीच्या झालेल्या पाच सेटच्या लढतीत ६-३, ६-७, ६-२, ३-६, ६-२ असे पराभूत केले.
महिलांच्या एकेरीत विजेतेपदाच्या शर्यतीत असलेली चौथी मानांकित रशियाची मारिया शारापोव्हाने बिगरमानांकित ब्रिटनच्या जोहाना कोंटाला सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-२ असे नमवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे माजी नंबर वन आणि १६व्या मानांकित अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सने आपल्या देशाच्या मॅडिसन ब्रेंग्लेचा ६-०, ६-० असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
(वृत्तसंस्था)

महिला गटात दुसऱ्या मानांकित क्वितोव्हाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून नेदरलॅँडच्या मिकी बर्टन्सला ६-१, ६-० असा पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दोन वेळा विजेतेपद जिंकलेल्या क्वितोव्हाने आपल्या सर्व्हिसवर फक्त एक गुण गमावला. तिची दुसऱ्या फेरीत जपानच्या कुरुमी नाराविरुद्ध लढत होणार आहे.
दुसरीकडे जर्मनीच्या एंजेली केरबरने आपल्याच देशाच्या कारिना विटहोफचा ४५ मिनिटांत ६-०, ६-० असा सहज पराभव केला. केरबरने या सामन्यात २१ विनर्स शॉट मारले.

रॉजर फेडरर
-दुसरा मानांकित रॉजर फेडररने पुरुष एकेरीत बोस्निया हर्जेगोविनाच्या दामिर गुमहुरचा एक तास सात मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१, ६-३, ६-३ असा पराभव केला. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध होईल,
-राफेल नदालला फेडररच्या तुलनेत एका तासापेक्षा जास्त वेळ कोर्टवर घालवावा लागला. या स्पर्धेत दहावे मानांकन असलेल्या नदालने ब्राझीलच्या थॉमस बेलुचीला ही लढत दोन तास दहा मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ६-२, ६-४ असे पराभूत केले. नदालला आता अंतिम ३२ मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनविरुद्ध खेळावे लागणार आहे.

Web Title: Federer, Nadal, Sharapova easily win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.