शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेडरेशन चषक कॅरम : एअर इंडियाच्या संदीप दिवेला दुहेरी मुकूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:23 IST

उत्तर प्रदेश येथे २५ व्या अखिल भारतीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन.

वाराणसी: २५ व्या अखिल भारतीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत एअर इंडियाच्या संदीप दिवेने कमाल केली बिगरमंकित दिवेने आपल्या आक्रमक खेळाने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी बिगरमानांकीत जैन इरिगेशनच्या अनिल मुंढेला २४-१२, २५-१० असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजेतेपद पटकाविले. तर पुरुष दुहेरीमध्येही संदीपने रियाझ अकबर अलीच्या साथीने रिझर्व्ह बँकेच्या झहीर पाशा व रवी वाघमारे जोडीला  २५-७, २५-६ असा पराभव केला. या विजयामुळे संदीपला दुहेरी मुकुट मिळाला. संदीपचे राष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच विजतेपद आहे. एअर इंडियाने काँट्रॅक्टवर घेतल्यावर पहिल्याच वर्षी केलेल्या या कामगिरीमुळे संदीपचे सर्व स्तरावर विशेष  कौतुक होत आहे. या विजयाबरोबरच संदीपने राष्ट्रीय स्तरावर ५ वे स्थान प्राप्त केले आहे. 

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये विश्व् विजेत्या प्रशांत मोरे ( रिझर्व बँक स्पोर्ट्स बोर्ड ) ने  फहिम काझी ( महाराष्ट्र ) याचा २५-१७,२५-१५ असा पराभव करत तिसरा क्रमांक पटकाविला. तर पुरुष दुहेरीत झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या रिझवान चमन व महम्मद आरिफ जोडीने बिहारच्या जलज कुमार व नवीन कुमार जोडीवर २५-१२, २५-१५ असे सरळ दोन सेटमध्ये मात केली. 

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या नागज्योथीने आपल्याच सहकारी माजी विश्व् विजेत्या  पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या रश्मी कुमारीचा २५-०, १३-३ असा सहज फडशा पाडून विजेतेपद व सर्वांची वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खोकावलाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस. अपूर्वावर पहिला सेट ४-२५ असा गमाविल्यानंतरही  दुसरा व तिसरा सेट २५-१४, २५-१५ असा जिंकला.                              

महिला दुहेरीच्या लढतीत जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खोकावलाने नीलम घोडकेच्या साथीने पेट्रोलियम सपोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या रश्मी कुमारी व आय. इलवझकी जोडीला अटीतटीच्या लढतीत २३-२४, २२-१०, २२-१० असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर महिला दुहेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या  नागज्योथी व पी. जयश्री जोडीने तामिळनाडूच्या एस. रोशनीश्री व पी. शवशीनी जोडीवर २२-८, २५-८ असा सहज विजय मिळविला.       

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र